Uttar Pradesh: संपत्तीच्या वादातून धाकट्या भावाची हत्या, एकास अटक; उत्तर प्रदेशमधील घटना
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) गाझियाबाद (Ghaziabad) येथून एक धक्कादायक घटना घडली आहे. विजय नगर पोलीस ठाण्याच्या (Vijay Nagar Police Station) हद्दीतील सुदामपूरी परिसरात एका व्यक्तीने संपत्तीच्या वादातून त्याच्याच धाकट्या भावाची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंजेब अली असे मृताचे नाव आहे. अंजेब हा त्याचा मोठा भाऊ मोहम्मद उस्माम याच्यासोबत सुदामपुरी येथे राहायला होता. यांच्यात गेल्या काही दिवसांपासून संपत्तीवरून वाद सुरु होता. याच मुद्द्यावरून शुक्रवारी दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला. याचदरम्यान, राग अनावर झाल्याने मोहम्मद उस्मानने अंजेबवर चाकूने हल्ला केला. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या अंजेबला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान अंजेबचा मृत्यू झाला. हे देखील वाचा- Gujarat Shocking: गुजरातच्या गांधीनगरमधील 5 स्टार हॉटेलच्या रिसेप्शनिस्टची चाकू भोसकून हत्या

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. अंजेब याचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी जवळच्या रुगणालयात पाठवण्यात आला आहे. तसेच मृताच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक (शहर) महिपाल सिंह यांनी दिली आहे.