Mukesh Sahani's Father Murdered In

Mukesh Sahani Father Killed: बिहारच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे. येथे विकासशील इन्सान पार्टीचे व्हियापी प्रमुख मुकेश साहनी यांचे वडिल जीतन साहनी यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर बिहारच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी सकाळी पोलिसांनी या घटनेची माहिती उघडकीस केली. हत्येच्या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. ( हेही वाचा- माथेरानला फिरण्यासाठी गेलेले जोडपे बेपत्ता, पाच दिवसांनी सापडला मृतदेह, पोलिसांचा तपास सुरु)

मिळालेल्या माहितीनुसार, दरभंगा येथील त्यांच्या वडिलोपार्जित घरात त्यांचा मृतदेह आढळला. त्याच्या शरिरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा दिसत होत्या. हत्येची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात पोलिस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. या घरात जीतन साहनी यांच्या व्यतिरिक्त 2 ते 3 नोकर आणि एक ड्रायव्हर राहत असल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेचे दृष्य सोशल मीडियावर समोर आले आहे. स्थानिक पत्रकाराने शेअर केलेल्या माहितीनुसार, मृतदेह रक्ताने माखलेला होता आणि धारदार शस्त्राने शरिरावर खुणा होत्या. बेडवर झोपलेल्या असताना त्यांच्यावर हल्ला झाल्याचे दिसून येत आहे. हा हल्ला विकृत होता.