रिलायन्स (Relience) उद्योगसमुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचे एका कार्यक्रमात तोंडभरून कौतुक केले आहे. या कार्यक्रमात मुकेश अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शहा यांच्या कामाची प्रशांसा केली आहे. नरेंद्र मोदी यांनी देशासाठी नेहमीच योग्य निर्णय घेतले आहेत. यामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या दृष्टिकोनामुळे प्रभावित झालो आहे, असेही मुकेश अंबानी म्हणाले.
मुकेश अंबानी हे स्वतः या खासगी विद्यापीठाचे कुलपती आहेत. गुजरातमधील (Gujrat) पंडीत दिनदयाळ उपाध्याय पेट्रोलियम विद्यापीठाचा पदवी प्रदान कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मुकेश अंबानी यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या कामाचे भरभरुन कौतूक केले आहे. उरी आणि पुलवामा येथील दहशतवादी हल्यानंतर दहशतवाद्यांविरोधात नरेंद्र मोदीं यांनी महत्वाचा निर्णय घेतला होता. त्यावेळी भारताकडून दहशतवाद्यांना चोख उत्तर देण्यासाठी हल्ले करण्यात आले होते, असे मुकेश अंबानी म्हणाले. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे अनुच्छेद ३७० रद्द केल्याबदल मुकेश अंबानी यांनी नरेंद्र मोदींचे कौतूक केले. हे देखील वाचा-नारायण राणे यांचा भाजपा पक्ष प्रवेश 1 सप्टेंबरला; महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचेही विलीनीकरण होणार
केवळ मुकेश अंबानी नव्हे तर, देशातील अनेक राजकीय नेते, सामान्य जनतासह इतर लोकांनी मोदींच्या निर्णयाचे नेहमी कौतूक केले आहेत. मात्र, मोदींनी घेतलेल्या काही निर्णयांमुळे देशाचे नुकसान होत आहे, असा दावा विरोधी पक्षातील नेते करत आहे.