Crime Image File

Madhya Pradesh News: मध्य प्रदेशातील उज्जैन (Ujjain) जिल्ह्यात रविवारी एका 45 वर्षीय व्यक्तीने आपली पत्नी आणि दोन मुलांचा तलवारीने वार करून खून (Murder) केला आणि नंतर स्वत:ला मारले.  जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 50 किमी अंतरावर असलेल्या बडनगर भागातील कुटुंबाच्या घरी रविवारी पहाटे ही घटना घडली, असे त्यांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीसांना या घटनेची माहिती मिळताच,घटनास्थळी दाखल झाले. सर्व मृतदेह ताब्यात घेतले आहे.

पोलीस उपविभागीय अधिकारी महेंद्रसिंग परमार यांनी तपासात सांगितले की, दिलीप पवार यांनी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास अचानक आपल्या पाळीव कुत्र्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांची पत्नी गंगा (40), त्यांचा मुलगा योगेंद्र (14) आणि मुलगी नेहा (17) यांनी मध्यस्थी करून पवार यांना पाळीव प्राणी एकटे सोडण्यास सांगितले. त्यानंतर रागाच्या भरात पवार यांनी पत्नी आणि दोन मुलांची तलवारीने हत्या केली.

त्याची इतर दोन मुले सुरक्षिततेसाठी घराबाहेर पळून गेली, काही वेळानंतर, आरोपीने आपल्या घरात धारदार शस्त्राने वार करून आत्महत्या केली, असे त्याने सांगितले. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतला त्यावेळी सर्व मृतदेह ताब्यात घेतले. सर्व मृतदेह श्ववेच्छेदनासाठी पाठवण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.कर्जाच्या ताणावमुळे हे कृत्य केल्याचे प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.