Noida Shocker: ग्रेटर नोएडातून (Noida) हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे. येथे आईने आपल्या 6 महिन्यांच्या मुलीला मिठीत घेऊन 16 व्या मजल्यावरून उडी मारली. यात आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून दोघींचेही मृतदेह ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.
डिप्रेशनने त्रस्त होती महिला -
ही धक्कादायक घटना ग्रेटर नोएडा वेस्टमधील एका ग्रुप हाऊसिंग सोसायटीतील आहे. जिथे मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास एका महिलेने आपल्या मुलीला मिठीत घेऊन उंच इमारतीवरून उडी मारली. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले. प्राथमिक तपासात ही महिला डिप्रेशनची बळी असल्याचे समोर आले आहे. (हेही वाचा -Lucknow Shocker: वसतिगृहात व्हिडिओ रेकॉर्डिंग करत विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेम प्रकरणातून उचललं धक्कादायक पाऊल)
बुधवारी सकाळी माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, मृत महिलेचे वय 33 वर्षे आहे. काही दिवसांपासून तिची प्रकृती ठीक नव्हती. मुलीच्या जन्मानंतर तिला नैराश्याने ग्रासले होते. हाऊसिंग सोसायटीच्या 16व्या मजल्यावर ती कुटुंबासह राहत होती. मात्र रात्री अचानक ती बेडवरून उठली आणि तिने आपल्या मुलीला आपल्या मिठीत घेतले. यानंतर तिने 16व्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत दोघींचा मृत्यू झाला आहे. (हेही वाचा - Bengaluru: आईने हत्या केलेल्या चार वर्षाच्या मुलावर बंगळुरु येथील हरिश्चंद्र घाटावर अंत्यसंस्कार)
प्राप्त माहितीनुसार, घटनेच्या एक दिवस आधी महिलेने आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा केला होता. महिलेचा नवरा अमेरिकेत काम करतो. लॉ रेसिडेन्सी सोसायटीत ही महिला तिचा भाऊ आणि आईसोबत राहत होती. पोलिसांनी सांगितले की, सारिका असं या मृत महिलेचे नाव आहे. टॉवर-2 च्या 16व्या मजल्यावर ती भाऊ आणि आईसोबत राहत होती. महिलेला 4 वर्षांचा मुलगाही आहे.