Uttar Pradesh Crime: आई आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना, मित्राच्या मदतीने अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ; आरोपींना अटक
Abuse | File Image

Uttar Pradesh Crime:  उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील एका महिलेला तिच्या मित्रासोबत अटक करण्यात आले आहे. आरोपी महिलेने तिच्या पोटच्या मुलीवर अत्याचार आणि लैंगिक छळ केले होते या धक्कादायक घटनेचा खुलासा झाल्यावर आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. १० वर्षाची मुलगी २० जानेवारी रोजी गाझियाबाद येथील तिचं घर सोडून गेली होती. त्यानंतर ती दिल्लीच्या रस्त्यावर फिरताना पोलिसांना सापडली होती. (हेही वाचा- नवी मुंबईत आफ्रिकन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी तीला ताब्यात घेतल्यानंतर बाल कल्याण समितीकडे सोपवण्यात आले. धक्कादायक म्हणजेत मुलीची वैद्यकिय तपासणी केली होती. तिच्यावर बलात्कार झाल्याचे उघड झाले. पीडितेने पोलिसांना सर्व घटनांची माहिती दिली. तीने सांगितले की,तिच्या वडिलांचा चार वर्षापूर्वी मृत्यू झाला होता आणि तेव्हापासून ती आणि तिचा 13 वर्षाचा भाऊ तिच्या आजी आणि आजोबांसोबत राहत होते. गेल्या वर्षी तिची आई भावंडांना घेऊन गाझियाबाद येथील घरी गेली होती.

आईच्या मित्राने घरी येऊन अत्याचार केला. सुरुवातीला भावांचे लैंगिक शोषण केले आणि त्यानंतर तिचा भाऊ घर सोडून गेला. वडिलांच्या मृत्यूनंतर आई वेश्याव्यवसायात गुंतलेली असल्याचे समजल्यानंतर पीडितेने घर सोडले. पीडितेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीची ओळख पटली असून आरोपीचा शोध घेण्यास आला आहे. पीडितेला या घटनेची माहिती कोणाला सांगून नको म्हणून नेहमी धमकी देखील मिळायची. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केले आहे.