
Noida Shocker: नोएडातील एका सोसायटीत(Noida Society) दूषित पाणी पुरवठा झाल्याचा फटका सोसायटीतील 200 हून अधिक रहिवाशांना बसला आहे. 200 हून अधिक लोक आजारी पडले. सोमवारी ही घटना घडली. दूषित पाणी प्यायल्याने (contaminated water)रहिवासी आजारी पडले. बाधित नागरिकामध्ये लहान मुलांची संख्या सर्वाधिका आहे. बाधित नागरिकांना उलट्या आणि जुलाब यांसारखी आजार जाणवू लागले होते. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काहींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे.
सुपरटेक इको व्हिलेज असे त्या सोसायटीचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी सोसायटीतील पाण्याची टाकी साफ केल्यानंतर रहिवासी आजारी पडण्याच्या तक्रारी सुरू झाल्याचे तेथील रहिवाशांनीच सांगितल्याचे समजते. तक्रीत एका महिलेने सांगितले की, "माझा मुलगा कोचिंग इन्स्टिट्यूटमधून आला आणि त्याने तब्येतीची तक्रार केली. त्याला कोचिंग क्लासेसमध्ये दोनदा उलट्या झाल्या होत्या. त्यानंतर काही वेळाने, माझ्या लहान मुलाने, जो 8 वर्षांचा आहे, त्याने देखील तब्येतीची तक्रार केली," असे सोसायटीतील रहिवाशांनी सांगितले. 50 पेक्षा जास्त मज्लयांची ही इमारत आहे. दुसऱ्या तक्रारीत सांगितले गेले की, "मी देखील रात्री 9 वाजता ऑफिसमधून परत आलो आणि रात्री 11 च्या सुमारास मला मळमळ वाटू लागली. हे सर्व दूषित पाणी प्यायल्यामुळे होत आहे," असा दावा त्यांनी केला.
आणखी एका रहिवाशाने सांगितले की, रविवारी रात्रीपासून मुले उलट्या आणि जुलाबाची लक्षणे असल्याच्या तक्रारी करत आजारी पडले. त्यांनीही पोटदुखीची तक्रार केल्याचे सांगितले. आम्हाला वाटले की मुलांनी बाहेर काहीतरी खाल्ले असेल आणि त्यामुळेच हे घडत आहे. पण जेव्हा आम्ही सोसायटीतील लोकांशी बोललो तेव्हा खरी परिस्थीती समजली,"