
प्रेम प्रकरणातून एका तरुणाने अल्पवयीन मुलाची हत्या (Murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना रायपूरच्या (Raipur) टिकरापारा पोलीस ठाण्याच्या (Tikrapara Police) हद्दीत बोरियाखुर्द गावात रविवारी घडली आहे. याप्रकरणी टिकरापारा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मृतक यांचा एकाच मुलीवर जीव जडला होता. यातूनच ही हत्या करण्यात आल्याचे समजत आहे. रायपूरमध्ये वारंवार होत असलेल्या हिंसेच्या बातम्यांमुळे सर्वांनीच चिंता व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टिकारापारा येथील नेहरू नगर येथे राहणारा राहुल तांडी (वय, 17) रविवारी दुपारी 12.30 च्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत जुन्या तलावाजवळ बसला होता. यावेळी झुबेर नावाचा एक तरुण आला आणि त्याने राहुलला बोरियाखुर्द येथून स्कूटीवरून घरी सोडतो, असे म्हणाला.. तेथून राहुल, गोपी आणि झुबेर बोर्याखुर्दच्या आरडीए कॉलनीत पोहोचले. तिथे आधीच मुख्य आरोपी जावेद थांबला होता. जावदने राहुला पाहताच त्याला स्कूटरवरून खाली ढकलले. राहुल खाली पडताच जावेदने त्याला चाकूने सपासप वार केले. ज्यात राहुलचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपीने त्याचा मृतदेह सोडला आणि तेथून पळून गेले होते. हे देखील वाचा- Amravati Murder: मुलगी आणि जावयाचे भांडण मिटवणे सासूच्या जीवावर बेतले; अमरावती येथील धक्कादायक घटना
याप्रकरणी अन्य दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. दरम्यान, डीजीपी यांनी एक बैठक घेऊन पोलीस अधिकाऱ्यांना प्रोफेशनल पोलिसिंगवर जोर देण्याचे आवाहन केले आहे. रायपुरचे एसएसपी अजय यादव यांनी चाकू कोठून मागविण्यात आला, याबाबत चौकशी सुरु केली आहे. यासाठी त्यांनी अॅमेजॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांनाही पत्र लिहिले आहे.