Telangana Video: मंत्री श्रीदहर बाबू यांच्या ताफ्यातील कारने पोलिस अधिकाऱ्याला दिली धडक, घटनेचा Video व्हायरल
Telangana PC TWITTER

Telangana Video: तेलंगणाचे मंत्री डी श्रीदहर बाबू यांच्या ताफ्यातील एका कारने पोलिस अधिकाऱ्याला धडक दिली आहे. ही घटना एकाने कॅमेऱ्यात कैद केली आहे. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  प्राप्त माहितीनुसार, ताफ्याचा इतर वाहनांचा पाठलाग करत येत असताना ही घटना घडली. या धडकेत पोलिस अधिकारी जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. IPS अधिकारी परितोष पंकज असं अपघातात जखमी झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. अपघातात वाहानाची धडक लागल्याने ते जमिनीवर पडले, सुदैवाने कार अंगावरून गेली नाही. या अपघाताचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- कॅराकलने पहिल्यांदा आरशात पहिल्यानंतर दिली सुंदर प्रतिक्रिया, व्हिडीओ व्हायरल