Heat Wave प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

Heat Wave in India: देशातील बहुतांश राज्यांमध्ये तापमान सातत्याने वाढत आहे. एप्रिल महिना संपत आला असून पुढील महिन्यात तापमानात आणखी वाढ होणार आहे. मे-जूनपूर्वी एप्रिलमध्येच कडक उन्हाळा जाणवत आहे. दरम्यान, हवामान खात्याने 9 राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) इशारा दिला आहे. देशातील अनेक शहरांमध्ये तापमानाने चाळीशी ओलांडली आहे.

सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आलेली शहर -

बारीपदात 44.2 अंश तापमान नोंदवण्यात आले. चंद्रपूर, ब्रह्मपुरी, बांकुरा, श्रीनिकेतन आणि पानगढमध्ये पारा 43 च्या पुढे गेला आहे. अकोला, गोंदिया, अमरावती येथे पारा 42 अंशांवर आहे. कोलकाता, दमदम, उलुबेरिया, कोंटाई आणि कृष्णानगरमध्येही तापमान 40-41.6 अंशांपर्यंत आहे. (हेही वाचा - Viral Video: ताडोबा येथे उष्णतेचा पारा ४३.२ अंश सेल्सिअस, बबली वाघाने तीन बछड्यांना घेऊन घेतला जलक्रीडांचा आनंद)

या राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेबाबत अलर्ट जारी -

पश्चिम बंगाल

सिक्कीम

ओडिशा

झारखंड

उत्तर प्रदेश

आंध्र प्रदेश

पुद्दुचेरी

महाराष्ट्रात बिकट परिस्थिती -

तापमानाने चाळीशी ओलांडलेल्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील अनेक शहरे आहेत. अशीही अनेक राज्ये आहेत जिथे तापमान सामान्यपेक्षा 5 अंशांनी वाढले आहे. यामध्ये पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि बिहार यांचा समावेश आहे.

उत्तर भारताची स्थिती - 

उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये तापमान सामान्यपेक्षा 3-5 अंशांनी जास्त आहे. यामध्ये पंजाब, उत्तर प्रदेशातील बहुतांश भाग, दिल्ली, हरियाणा आणि चंदीगडचा समावेश आहे. तसेच छत्तीसगड आणि मध्य प्रदेशचीही स्थिती तशीच आहे. गुजरात, तेलंगणा, रायलसीमा, तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल, राजस्थान, विदर्भ आणि अंदमान आणि निकोबार हे क्षेत्र आहेत, ज्यात सामान्य तापमान 2 ते 3 अंशांनी जास्त आहे.

याशिवाय देशातील अनेक भागात पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. यामध्ये जम्मू, काश्मीर, लडाख, गिलगिट, मुझफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेशचा समावेश आहे. पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये गारपीट होऊ शकते. उत्तर भारतातील हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि राजस्थानमध्ये वादळाची शक्यता आहे. दुसरीकडे, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, ओडिशा, जम्मू, काश्मीर, लडाख, गिलगिट आणि मुझफ्फराबादमध्ये वादळ येण्याची शत्यता आहे.