Delhi Murder: उसने घेतलेले 300 रुपये परत न केल्याने एकाची हत्या, दिल्लीच्या आनंद पर्वत परिसरात खळबळ
Image used for representational purpose

दिल्लीच्या (Delhi) आनंद पर्वत परिसरातून (Anand Parabat) एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. उसने घेतलेले 300 रुपये परत न केल्याने एका जणांची हत्या (Murder) करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी (3 ऑक्टोबर) संध्याकाळी घडली आहे. या घटनेची माहिती होताच दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) घटनास्थळी धाव घेतली. तसेच याप्रकरणी पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, शैलेंदर असे मृताचे नाव आहे. शैलेंदर हा एका केमिस्टच्या दुकानात काम करायचा. दरम्यान, त्याने आरोपीकडून 300 रुपये उसने घेतले होते. त्यानंतर शनिवारी सकाळी आरोपीने फोनद्वारा पैसे परत करण्यास सांगितले. मात्र, आपण संध्याकाळी पैसे परत करतो असे सांगून शैलेंदरने फोन ठेवून दिला. याचवेळी शैलेंदरला आरोपीच्या एका मित्राचा फोन आणि त्याने संध्याकाळपूर्वी पैसे देण्यास सांगितले. परंतु, शैलेंदरने असहमती दर्शवली. ज्यामुळे आरोपीला राग अनावर झाला. हे देखील वाचा- Bhopal Suicide Case: मध्य प्रदेशमध्ये ऑनलाइन फसवणुकीत 5 लाख रुपये गमावल्यानंतर 26 वर्षीय महिलेने आपले आयुष्य संपवले

त्याच दिवशी शैलेंदर हा केमिस्टमधून निघाल्यानंतर त्याच्या घरी जात असताना मुख्य आरोपीसह 3 जणांनी त्याला अडवले. तसेच या तिघांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. याचवेळी आरोपींपैकी एका जणाने चाकूने शैलेंदरवर हल्ला केला. ज्यात तो गंभीर जखमी झाला. ज्यामुळे उपचारापूर्वीच शैलेंदरचा मृत्यू झाला.