Telangana Shocker: तेलंगणात (Telangana) तरुणाने आपल्या प्रेयसीची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावेळी प्रेयसीसोबत असलेल्या तिच्या बहिणीवरही आरोपीने हल्ला केला. या हल्ल्यात मृत तरुणीची बहिण जखमी झाली. तेलंगणातील निर्मल जिल्ह्यातील खानपूर शहरात गुरुवारी ही घटना घडली. मयत तरुणी आणि आरोपीमध्ये प्रेमसंबंध होते. मुलीचे कुटुंबीय मुलीसाठी वराचा शोध घेत होते. वडिलांना मुलीचे लग्न लावायचे होते. कुटुंबिय जावई शोधत असल्याने तरुणीने तिच्या प्रियकरापासून अंतर राखण्यास सुरुवात केली. यामुळे आरोपी संतापला.
मुलीचा जागीच मृत्यू, बहीण जखमी -
आलेख्या असे मृत तरुणीचे नाव आहे. गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास ती शिलाई संस्थेतून बहिणीसोबत परतत होती. दरम्यान, तिचा प्रियकर जुकांती श्रीकांत याने तिच्यावर कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात आलेख्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी तिची बहीणही या हल्ल्यात जखमी झाली आहे. (हेही वाचा - Greater Noida Shocker: ग्रेटर नोएडामधील लज्जास्पद घटना; फुलांच्या शेतात 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, पीडितेची प्रकृती चिंताजनक)
हल्ल्यानंतर श्रीकांतने घटनास्थळावरून पळ काढला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आलेख्य आणि श्रीकांत यांच्यात प्रेमसंबंध होते. जेव्हा कुटुंबाने तिच्या लग्नाची योजना सुरू केली तेव्हा आलेख्याने श्रीकांतपासून अंतर राखण्यास सुरुवात केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.