भाजपचे (BJP) मंत्री एस. टी. सोमशेकर (S.T. Somashekar) यांच्या मुलाला ब्लॅकमेल (Blackmail) करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पोलिसांनी (Police) एका व्यक्तीला अटक (Arrest) केली आहे. आरोपी राहुल भट याला केंद्रीय गुन्हे शाखेने (Central Crime Branch) अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. भट यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सोमशेकर यांचा मुलगा निशांत याने 27 डिसेंबर रोजी सायबर पोलिसात तक्रार दाखल केली होती की, त्याच्या वडिलांचे स्वीय सचिव भानू प्रकाश यांना अज्ञात व्यक्तींकडून खंडणीचे कॉल आले होते. कॉल करणाऱ्यांनी खंडणीची मागणी केली आणि त्यांची मागणी पूर्ण न केल्यास निशांतचा कथित सेक्स व्हिडिओ जारी करण्याची धमकी दिली. हेही वाचा Shocking! दोन मुलांनी आईची लावून दिली 6 लग्ने; समोर आले धक्कादायक कारण
निशांतने दिलेल्या तक्रारीनुसार, खंडणीखोरांनी त्याचे काही c केलेले फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवले. काही लोक वडिलांच्या मॉर्फ केलेल्या प्रतिमा वापरून त्यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, या गुन्ह्यात आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्यांना पकडण्यासाठी तपास सुरू आहे.