सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेशन म्हणजेच CBDTने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार संपूर्ण देशात आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्रच बाहुबली असल्याचे सिद्ध झाले आहे. आपणास आश्चर्य वाटेल पण, देशातील राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र आणि दिल्ली ही दोन राज्ये देशाला आर्धा इनकम टॅक्स देतात. सीबीडीटीच्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०१७/१८मध्येही इनकम टॅक्स कलेक्शनमध्ये पूर्वेकडील राज्यांनीच बाजी मारली आहे. महाराष्ट्राने राज्याच्या स्थापनेनंतर केलेल्या कृषी, औद्योगिक, कॉर्पोरेट आणि इतर क्षेत्रांमधल्या प्रगतीची पोचपावतीच या आकडेवारीने दिली आहे.
२०१७/१८ या आर्थिक वर्षात प्रमुख ५ राज्यांनी दिलेले योगदान (टक्केवारीत )
- महाराष्ट्र - ३८.३%
- दिल्ली - १३.७%
- कर्नाटक - १०.१%
- तमिलनाडु - ६.७%
- गुजरात - ४.५%
(हेही वाचा,'ईपीएफओ'मध्ये लवकरच परिवर्तन; व्याजदरातही होणार मोठे फेरबदल)
सर्वाधिक आयकर जमा करणारी पूर्वेकडी प्रमुख ५ राज्ये
- मिजोरम - ४१%
- नागालैंड - ३२.१%
- सिक्किम - २६%
- त्रिपुरा - १६.७%
- मेघालय - १२.७%