Maha Shivratri 2020: महाशिवरात्र निमित्त मुंंबईच्या बाबुलनाथ मंदिरापासून वाराणसीच्या काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी (Watch Photos)
Maha Shivratri 2020 | Photo Credits: Twitter

मुंबई सह देशभरात आज महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या धामधुमीमध्ये साजरा केला जात आहे. मध्यरात्रीपासूनच देशभरात भगवान शंकराची मंदिरं भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत. दरम्यान मुंबईमध्येही बाबुलनाथ मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात आली आहे. यंदा शिवभक्तांसाठी महाशिवरात्र खास आहे. महाशिवरात्री दिवशी आज 59 वर्षांनी शश योग जुळून आला आहे. या दिवशी शनि आणि चंद्र मकर राशी, गुरु धनु राशीत, बुध कुंभ राशीत आणि शुक्र मीन राशीत राहतील. त्यामुळे हा योग सिद्धी आणि साधनासाठी खास आहे असे सांगण्यात आले असून या दिवशी पूजा केल्याने अथवा दान केल्याने लाभ मिळतो अशी मान्यता आहे. Happy Maha Shivratri 2020 Images: महाशिवरात्र निमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या शिवभक्तांना पावन पर्वाच्या शुभेच्छा!

माघ वद्य चतुर्दशी'ला महाशिवरात्रीचे व्रत केले जाते. महाशिवरात्री निमित्त सर्व शिवभक्तांमध्ये उत्साह असतो. या दिवशी शिवभक्त उपवास, पूजा, जागरण अशाप्रकारची व्रतं केली जातात. महाशिवरात्र या शब्दाचा अर्थ 'शिवाची महान रात्र' असा होतो. त्यामुळे देशभरातील सर्व शिवभक्तांमध्ये महाशिवरात्रीचा मोठा उत्साह पहायला मिळत आहे. Maha Shivratri 2020: भारतातील या '6' भव्य शिवमंदिरात 'महाशिवरात्री'चा उत्सव असतो खास.  

आज देशभरात असा आहे महाशिवरात्रीचा उत्साह

बाबुलनाथ मंदिर, मुंबई

काशी विश्वनाथ मंदिर, वाराणसी

महाकालेश्वर मंदिर, उज्जैन

गौरी शंकर मंदिर, दिल्ली

महाशिवरात्रीचा उत्सव हा शिवभक्तांसाठी खास असतो. आजच्या दिवशी मनोकामना पूर्ण करण्यासाठी भाविक शंकर मंदिरात जाऊन भोलेनाथाची पूजा करतात. त्याला दूध, पाण्याचा अभिषेक करतात. सोबतच बेल अर्पण केले जातात. दरम्यान भगवान शंकर देवांचा देव असून त्याला सृष्टीचा संरक्षणकर्ता समजलं जातं.