Happy Maha Shivratri 2020 Images: महाशिवरात्र निमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या शिवभक्तांना पावन पर्वाच्या शुभेच्छा!
Maha Shivratri 2020 Images| File Photo

Happy Maha Shivratri Images and Wishes in Marathi: भगवान शंकराची आराधना करणार्‍यांसाठी माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी खास असते. या दिवशी हिंदू समाजात महाशिवरात्र (Maha Shivratri) साजरी केली जाते. या मंगल पर्वाचं औचित्य साधत भगवान शंकराचे भाविक त्याच्या देऊळामध्ये मोठी गर्दी करतात. इच्छा, आकांक्षा देवासमोर व्यक्त करताना शंकराच्या पिंडीवर बेल, दूधाचा अभिषेक करतात. शंकर देवाला आवडणार्‍या या वस्तू अर्पण केल्याने मनोकामना पूर्ण होतील अशी त्यांची धारणा आहे. मग आज (21 फेब्रुवारी) दिवशी मोठ्या उत्साहाने साजरा केल्या जाणार्‍या या पर्वाच्या शुभेच्छा तुमच्या प्रियजनांना, मित्र, मैत्रिणींना आणि नातेवाईकांना देखील देऊन साजरी करा यंदा महाशिवरात्र. व्हॉट्सअ‍ॅप(WhatsApp), फेसबूक मेसेज (Facebook Messages), स्टेटसच्या माध्यामातून शंकराच्या भक्तांना या दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ही खास मराठमोळी ग्रीटिंग्स (Greetings), फोटो (Photo), वॉलपेपर (Wallpaper) याच्या माध्यमातून शुभेच्छा देऊन साजरा करा आजचा महाशिवरात्रीचा दिवस. Maha Shivratri 2020 Wishes: महाशिवरात्री निमित्त मराठी संदेश, Messages, Greetings, Whatsapp Status, Facebook Images, GIF's शेअर करुन शिवभक्तांचा दिवस करा मंगलमय!

यंदा शिवभक्तांसाठी महाशिवरात्र खास आहे. कारण यंदा महाशिवरात्रीला खास खास योग जुळून आला आहे. ज्याला शश योग म्हणतात. हा योग तब्बल 59 वर्षांनी येतो. या दिवशी शनि आणि चंद्र मकर राशी, गुरु धनु राशीत, बुध कुंभ राशीत आणि शुक्र मीन राशीत राहतील. त्यामुळे हा योग सिद्धी आणि साधनासाठी खास आहे असे सांगण्यात आले असून या दिवशी पूजा केल्याने अथवा दान केल्याने लाभ मिळतो अशी मान्यता आहे. Maha Shivratri 2020: भारतातील या '6' भव्य शिवमंदिरात 'महाशिवरात्री'चा उत्सव असतो खास.  

महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देणारे फोटो

Maha Shivratri 2020 Images| File Photo
Maha Shivratri 2020 Images| File Photo
Maha Shivratri 2020 Images| File Photo
Maha Shivratri 2020 Images| File Photo
Maha Shivratri 2020 Images| File Photo

महाशिवरात्र दिवशी शंकराचे भक्त देवाला प्रसन्न करण्यासाठी उपवास करतात. भगवान शंकर हा देवांचा देव असून तो सृष्टीचा संरक्षकर्ता आहे. त्यामुळे त्याची कृपादृष्टी कायम रहावी याकरिता महाशिवरात्रीच्या सकाळपासूनच भोलेनाथाच्या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. भाविक शंकराच्या आवडीच्या गोष्टी त्याला अर्पण करून आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करतात.