
Maha Shivaratri 2020 Marathi WIshes: दरवर्षी प्रमाणे यंदाही महाशिवरात्रीचा उत्सव भारतभर जल्लोषात साजरा केला जाईल. 'शिवाची महान रात्र' म्हणून साजरा होणारा महाशिवरात्रीचा उत्सव यंदा उद्या म्हणजेच शुक्रवार, 21 फेब्रुवारी रोजी आहे. या निमित्ताने अनेक शिवमंदिरात सजावट केली जाईल. भाविकांनी मंदिरं फुलतील. 'हर हर महादेव,' 'जय भोलेनाथ,' 'ओम नमः शिवाय' या मंत्रोच्चाराने सारे वातावरण पवित्र होईल. महाशिवरात्र भगवान शंकराच्या उपासकांसाठी अत्यंत खास असते. या दिवशी अनेक शिवभक्त शंकराच्या मंदिरात जावून दूध-पाणी वाहून शंकराच्या पिंडीवर अभिषेक करतात. शंकराला प्रिय असलेले बेलपत्रं अर्पण केले जाते. तसंच भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी उपवास, पूजा-प्रार्थना केली जाते. (Maha Shivratri 2020 Messages: महाशिवरात्रीच्या मराठमोळ्या शुभेच्छा Greetings, Wishes, WhatsApp Status, Facebook च्या माध्यमातून देऊन व्हा शिवशंकराच्या भक्तिरसात लीन)
शिवभक्तांसाठी खास असलेल्या या दिवशी मराठमोळे संदेश, Wishes, Greetings, GIF's शुभेच्छापत्रं फेसबूक, व्हॉटसअॅप आणि मेसेजेसच्या माध्यमातून शेअर आपल्या नातेवाईक, मित्रपरिवार आणि आप्तेष्ठांनाही या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा द्या.
महाशिवरात्री 2020 शुभेच्छा:
शिवशंकराच्या आशीर्वादाने तुमचे जीवन मंगलमय होवो
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!

शिव शंकरांचा महिमा अपरंपार !
शिव करतात सर्वांचा उद्धार,
त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो,
आणि भोले शंकर आपल्या जीवनात नेहमी
आनंदच आनंद देवो…
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!

शिव भोळा चक्रवर्ती।
त्याचे पाय माझे चित्ती॥
वाचे वदता शिवनाम।
तया न बाधी क्रोधकाम॥
धर्म अर्थ काम मोक्ष।
शिवा देखता प्रत्यक्ष॥
एका जनार्दनी शिव।
निवारी कळिकाळाचा भेव॥
महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..

शिव सत्य आहे,
शिव सुंदर आहे,
शिव अनंत आहे,
शिव ब्रम्ह आहे,
शिव शक्ती आहे,
शिव भक्ती आहे,
महाशिवरात्रीच्या तुम्हाला मन:पूर्वक शुभेच्छा!

बेलाचे पान वाहतो महादेवाला
करतो वंदन दैवताला
सदा सुखी ठेव माझ्या प्रिय जनांना
हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला ||

GIF's
भारतातील अनेक लहान मोठ्या शिवमंदिरात महाशिवजयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. पूजेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आजकाल महाशिवरात्री निमित्त संगीत कार्यक्रमांचीही पर्वणी असते.