Representational image (Photo Credit- IANS)

Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशातील इंदौर येथील एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा गळा कापल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पती पत्नीमध्ये वाद झाला त्यानंतर आरोपीने तीचा गळा कापला आणि त्यानंतर स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- क्षुल्लक कारणावरून अल्पवयीन मुलावर चाकूने हल्ला, चौघांवर गुन्हा दाखल)

मिळालेल्या माहितीनुसार, चौथराम मंडी परिसरात भरदिवसा एका पतीने रागाच्या भरात पत्नीचा गळा कापला. या घटनेअंतर्गत राजेंद्र नगर पोलिस स्टेशनमध्ये कारवाई सुरु केली आहे. पत्नीने मंडीत काम करु नयेत यावरून दोघांमध्ये वाद सुरु झाला. आरोपीने सुरुवातीला पत्नीवर वार केला आणि त्यानंतर स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना समोरच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या घटनेत महिलेचा जीव वाचला असून गळ्याला गंभीर दुखापत झाली आहे.

पीडितेचा आरडाओरड ऐकून तेथे उपस्थित असलेले लोक घटनास्थळी जमा झाले आणि त्या दोघांना ही रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. ही महिला काही दिवसांपासून तिच्या आई वडिलांकडे राहत होती अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. महिलेच्या भावाने पोलिस ठाण्यात तक्रार केली. पतीवर  कलम ३०७ गुन्हा दाखल करण्यात आला अशून पुढील तपास सुरु केला आहे. या घटनेमागचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी पोलीस महिलेचे जबाब नोंदविण्याचा प्रयत्न करत आहेत. तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.