Madhya Pradesh Crime: बिल भरण्यावरून बारमध्ये वाद, दोन तरुणांवर हल्ला, चार कर्मचारांना अटक
Arrest | (Representative Image)

Madhya Pradesh Crime:  मध्य प्रदेशातील उज्जैन येथे पैशाच्या कारणावरून दोन तरुणांना बिअर बारच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी मंगळवारी रात्री उशिरा ग्राहकाला मारहाण केली. पीडीत ग्राहकाला बंदुक देखील दाखवली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या आधारे चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. (हेही वाचा- खुर्चीने मोडले लग्न, उत्तर प्रदेश राज्यातील बुलंदशहर येथील घटना)

मिळालेल्या माहितीनुसार, उज्जैन येथील शांती पॅलेस संवनराखेडी बायपास रोडवर दोन तरुणांना काठ्यांनी मारहाण करून, रस्त्यावर ओढून मारहाण केली.हल्लेखोर हे बिअर बारचे कर्मचारी होते. तरुणांचा त्यांच्याशी पैशावरून वाद झाला. ही घटना अपना बार या ठिकाणी घडली. नीलगंगा पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी रात्री उशिरा आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, आरोपींना बंदूक दाखवून बेदम मारहाण केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्राहक आणि कर्मचारी यांच्यात बिल भरण्यावरून वाद झाला. अजय उर्फ ​​मोनू तिवारी, सोनू माळी उर्फ ​​मामा लंगडा, विकास सनोथिया, लकी माळी, प्रिन्स, भैय्या कांगडा, विकास बार आणि राज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.