Madhya Pradesh Accident: इंदूर-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बोलेरो आणि अज्ञात वाहनाचा भीषण अपघात; ८ जणांचा जागीच मृत्यू
Accident | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Madhya Pradesh Accident: इंदूर-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग(Indore Ahmedabad National Highway)वर बुधवारी रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात एका अज्ञात वाहनाने बोलेरो कारला जोरदार धडक दिली. त्यामुळे कारमधील ८ जणांचा जागीच मृत्यू (Died)झाला. तर, एक जण गंभीर जखमी (Injured)झाल्याची माहिती आहे. मृतांमध्ये पोलीस कॉन्स्टेबल तसेच महिलांचाही समावेश आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे, अपघातानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिस सध्या घटनेचा संपूर्ण तपास करत आहेत. (हेही वाचा:Andhra Pradesh Accident: बस-ट्रकची जोरदार धडक, 6 जणांचा होरपळून मृत्यू; 32 जखमी, वाहने जळून खाक)

पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे. या घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व लोक गुना जिल्ह्यातील रहिवासी होते. बुधवारी (ता. १५) ते कारने अलीराजपूरच्या बोरी गावात एका कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून परतत असताना रात्री उशिरा घाटबिलोड येथे अज्ञात वाहनाने त्यांच्या कारला धडक दिली. या अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर आरडाओरडा झाला. त्यामुळे परिसरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांचे त्याकडे लक्ष गेले. लोक जमा झाले आणि त्यांनी बचावकार्य केले. त्यामुळे काही काळ तेथे गोंधळाचे वातावरण होते. काहींनी पोलिसांना फोन केला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले. रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. मृतदेह बेटमा रुग्णालयात आणण्यात आले. मृतांची नावे अद्याप समोर आलेली नसून पोलिसांकडून ओळख पटवणे सुरू आहे.