Photo Credit -X

Andhra Pradesh Accident: आंध्र प्रदेश मधील (Andhra Pradesh) बापटला जिल्ह्यात बस ट्रकचा भीषण अपघात (Bus Truck Accident) झाला. त्यात सहा जणांचा मृ्त्यू (6 Died) झाला आहे. तर 32 जण जखमी (32 injured) झाल्याची माहिती मिळत आहे. अपघातावेळी बसमध्ये 42 जण प्रवास करत असल्याची माहिती मिळत आहे. जखमींवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस चिन्नागंजमहून हैदराबादला जात होती. या अपघाताचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. हा अपघात इतकी भीषण होता की बससह ट्रकने पेट घेतला होता. यात दोन्ही वाहनांच्या चालकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. (हेही वाचा:Jhunjhunu mine accident : राजस्थान मध्ये खाणीत लिफ्ट कोसळल्याने १४ जण अडकले, बचाव कार्य सुरू)

या धडकेमुळे लागलेल्या आगीचं स्वरूप खूप भीषण होतं. यामध्ये बस आणि ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला  आहे. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न झाले. मात्र, आगीत दोन्ही वाहने जळून खाक झाली आहेत. दरम्यान, 4 मृतकांची ओळख पटली आहे. उर्वरित दोन जणांची ओळख पटलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, खासगी बस हैदराबादकडे जात होती. हैदराबाद-विजयवाडा महामार्गावरील चिलकलुरीपेट मंडळाजवळ बस ट्रकला धडकली. ही धडक जोरदार झाली. दोन्ही वाहनांनी पेट घेतला. काही वेळातच संपूर्ण बस आगीत जळून खाक झाली. या भीषण अपघातात ट्रक आणि बस चालकाचा जागीच मृत्यू झाला.