Jhunjhunu Mine Accident : राजस्थान मध्ये खाणीत लिफ्ट कोसळल्याने १४ जण अडकले, बचाव कार्य सुरू
Photo Credit -X

Jhunjhunu mine accident : राजस्थान मधील झुंझुनू जिल्ह्यातील कोलिहान खाणीत(Kolihan Mine)काल रात्री उशिरा मोठी दुर्घटना घडली. लिफ्ट कोसळल्याने १४ जण खाणीत अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. तेथे बचाव कार्य (Rescue Operation)सुरू आहे. त्यापैकी आतापर्यंत तिघांची सुटका करण्यात आली आहे. तर अजूनही आतमध्ये अडकलेल्या काही जणांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हिंदुस्थान कॉपर लिमिटेड(Hindustan Copper Limited)ची तांब्याच्या धातूची ही खाण आहे. तांब्याची खाण 1967 मध्ये स्थापन झाली अडकलेले सर्व सुरक्षित असल्याची माहिती घटनास्थळावरील डॉक्टरांनी दिली आहे. त्याशिवाय, सतर्कतेची काळजी म्हणून नऊ रुग्णवाहिका खाणीबाहेर स्टँडबाय ठेवण्यात आल्या आहेत. (हेही वाचा:Election Commission of India : निवडणूक आयोगाकडून दाखल झालेल्या 425 तक्रारींपैकी 90% तक्रारींचे निराकरण; गेल्या दोन महिन्यांतील आकडेवारी जाहीर )

लिफ्टमध्ये कोलकाताचे एक दक्षता पथक तसेच खाण अधिकारी होते. खाणीत 2,000 फूट आत सर्व जण लिफ्टसह कोसळल्याचे समजते. अडकलेल्यांना प्राथमिक उपचार देण्यासाठी डॉक्टर आणि परिचारिकांचे असे आठ सदस्यीय पथक खाणीच्या बाहेर तैनात करण्यात आले आहे.

अडकलेल्या अधिकाऱ्यांमध्ये मुख्य दक्षता अधिकारी उपेंद्र पांडे, खेत्री कॉपर कॉम्प्लेक्स युनिटचे प्रमुख जीडी गुप्ता आणि कोलिहान खाणीचे उपमहाव्यवस्थापक एके शर्मा यांचा समावेश आहे. त्याशीवाय, दक्षता पथकासह फोटोग्राफर म्हणून खाणीत दाखल झालेला पत्रकारही अडकल्याची माहिती मिळत आहे.

"रेस्क्यू टीम सध्या अलर्टवर असून १४ जणांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहे. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. सर्वजण सुखरूप बाहेर येतील," असे आश्वासन स्थानिक आमदार धर्मपाल गुर्जर यांनी दिले.