Lockdown: Swiggy कंपनीचा कार्मचारी कपातीचा निर्णय, 14% कर्मचाऱ्यांना बसणार फटका; झोमॅटोने या आधीच घेतलाय असा निर्णय
Swiggy (Photo Credits: PTI)

ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी Swiggy ने कर्माचारी कपात केली आहे. या कंपनीने 1100 कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाचा सामना करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन (Lockdown) चार सुरु होण्याच्या एक दिवस आगोदर स्वीगीने हा निर्णय घेतला. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार Swiggy ने जवळपास 14% कर्माचरी कपात करण्याचा नर्णय घेतला आहे. कर्मचारी कपात करण्याचा निर्णय आमच्यासाठी अत्यंत वेदनादाई आहे. पण, नाईलाजाने तो आम्हाला घ्यावा लागतो आहे, असे Swiggy ने म्हटले आहे. दरम्यान, Swiggy कंपनीच्या आगोदर झोमॅटो कंपनीनेही असाच निर्णय घेतला आहे. झोमॅटो कंपनीने आपल्या 520 कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले आहे.

Swiggy ने कर्मचाऱ्यांना सोमवारी एक इमेल पाठवला आहे. या इमेलमध्ये कंपीनीचे सीईओ श्रीहर्ष यांनी म्हटले आहे की, Swiggy ने आपली किचन फॅसिलिटी निश्चित किंवा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या ईमेलमध्ये श्रीहर्ष यांनी म्हटले आहे की, आम्हाला दु:ख होत आहे की, 1100 कर्मचाऱ्यांना दूर करावे लागत आहे. कंपनीने प्रत्येक विभाग आणि श्रेणीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील अनेक शहरांतील प्रमुख कार्यालयांत कर्मचारी कपात केली आहे. कंपनीचा मनुष्यबळ विकास विभाग लवकरच पुढील निर्णयाबाबत माहिती देईल असेही श्रीहर्ष यांनी ईमेलमध्ये म्हटले आहे. (हेही वाचा, COVID-19 Impact: Zomato कंपनी 13 टक्के कर्मचाऱ्यांसह वेतनात सुद्धा कपात करणार)

अखेर BEST BUS कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे; ६०% कर्मचारी कामावर रुजू - Watch Video

दरम्यान, कंपनीच्या सीईओंनी आपल्या इमेलमध्ये असेही म्हटले आहे की, कर्मचारी कपातीच्या निर्णयायाचा फटका बसलेल्या कर्मचाऱ्यांना वित्तिय आणि करीअरशी संबंधीत सहकार्य केले जाईल. तसेच, जे कर्मचारी कंपनीच्या कर्मचारी कपातीत असतील त्यांना तीन महिन्यांचे वेतन दिले जाईल. याशिवाय कर्मचारी जितकी वर्षे कंपनीसोबत काम करत आहेत तेवढ्या महिन्यांचा पगार कर्मचाऱ्याला दिला जाईल. ही रक्कम नोटीस पीरियड दरम्यान दिल्या जाणाऱ्या वेतनापेक्षा वेगळी असेण.