...म्हणून ऐश्वर्या रायकडे मागितला घटस्फोट
तेज प्रताप आणि ऐश्वर्य राय (फोटो सौजन्य- फेसबुक)
लालू प्रसाद यादव यांचे पूत्र तेज प्रताप यांनी आपली बायको ऐश्वर्याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यामागील कारण स्पष्ट झाले नसल्याचे वृत्त दोन दिवसांपूर्वी येत होते. मात्र आता तेज प्रताप आणि ऐश्वर्या राय यांच्या विवाहित जीवनातील घटस्फोटाचे कारण उघडकीस आले आहे.
सहा महिन्यांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचा पूत्र तेज प्रताप याचा विवाह बिहारचे माजी मंत्री चंद्रिका राय यांची कन्या ऐश्वर्या हिच्या सोबत झाला होता. मोठ्या थाटामाटात या विवाहसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र लग्नाच्या काही महिन्यात या तेज प्रताप याने ऐश्वर्याने फसवले असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे तेज प्रतापला खूप मानसिक त्रास झाल्याचे ही त्याने सांगितले आहे.

तर या प्रकरणी तेज प्रताप यांच्या वकिलाने स्पष्टीकरण देत असे सांगितले की, या दोघांमध्ये विवाहसंबंध चांगले नव्हते. तसेच ती माझ्याशी एका कृष्णाला शोभेल अशी राधी बनू शकली नसल्याचे कारण तेज प्रतापने माध्यमांना सांगितले आहे.