Kedarnath: केदारनाथ हे भारतातील उत्तराखंड राज्यातील पवित्र धार्मिक स्थळांपैकी एक आहे. सद्या केदारनाथ ह्या मंदिराबाबत सर्वत्र चर्चा चालू आहे. याचदरम्यान केदारनाथ मंदिरातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर सद्या व्हायरल होत आहे. ह्या व्हिडिओत एक महिला बेदुंध होवून मंदिराच्या गाभाऱ्यात पैसे उडवत आहे. मंदिरातील शिवलींगा समोर असे गैरवर्तण केल्याचे दिसून येत आहे. याच प्रकरणी त्या महिलेवर पोलिसांनी (FIR) नोंदवला आहे. पवित्र स्थळी पैसांची उधळण करत रिल्स बनवणे महिलेला महागात पडले आहे.
मंदिरात रिल्स आणि व्हिडिओ बनवण्यास सक्त बंदी असताना देखील ह्या महिलेने रिल्स बनवले आहे त्यामुळे लोक हा व्हिडिओ पाहून भडकले आहे. मंदिरातील पुजारी ही देखील त्या महिलेला रिल्स आणि व्हिडिओ करण्यास मनाई करत नाही असे ह्या व्हिडिओतून स्षट दिसत आहे.
केदारनाथ धाम में श्रद्धालुओं की धार्मिक भावनाओं को ठेस पहुंचाने वालों के विरुद्ध कोतवाली सोनप्रयाग पर हुआ मुकदमा दर्ज।@BKTC_UK @DmRudraprayag @DIGGarhwalRange @uttarakhandcops pic.twitter.com/wUGlbiH7Nd
— Rudraprayag Police Uttarakhand (@RudraprayagPol) June 19, 2023
केदारनाथ मंदिराच्या समितीने घेतले हे निर्णय
केदारनाथ मंदिरातील समितीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ह्या संदर्भात दखल घेतली आहे. त्यावर तात्काळ कारवाई करण्यास येईल असे ही सांगितले आहे. लवकरच ह्या संबंधी योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे सांगितले आहे. पोलीसांनी ह्या प्रकरणात दखल घेतली आहे.