
Karnataka Shocker: सोशल मीडियावर (Social Media) अल्पवयीन मुलीशी मैत्री करून, तीच्याशी जवळीक साधून तीचा अश्लिल व्हिडिओ (Video) रोकॉर्ड करून सोबत तीला ब्लॅकमेल (Blackmail) केल्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. मुस्तफा असे आरोपीचे नाव आहे. पोलीसांनी त्याच्यावर लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (POSCO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने अल्पवयीन मुलीला इंस्टाग्रामवर तिच्याशी मैत्री केली होती. तरुणीला फसवल्यानंतर त्याने व्हिडिओ कॉलवर तिला पट्टी बांधून हे कृत्य रेकॉर्ड करायला सांगितले. त्याने स्क्रीन रेकॉर्ड करून घेऊन मुलीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तरुणीने गंगावठी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे. या घटने अंतर्गत पुढील तपास सुरू आहे.
या धक्कादायक घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर मैत्री करून अल्पवयीन मुलीचा व्हिडिओ रेकॉर्ड केला ही घटना लज्जास्पद आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, आरोपीवर लवकरच कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीसांकडून देण्यात आली आहे.