Skeleton | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Karnataka Shocker: कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग जिल्ह्यात एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचे सांगाडे मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या धक्कादाक घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या सांगाडे हे एकाच कुटुंबातील सदस्याचे आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एक घर बंद होतं अशी माहिती स्थानिकांनी दिली.  फॉरेन्सिक तपासणीनंतरच मृताची ओळख पटू शकेल, असे पोलिसांनी सांगितले, शवविच्छेदनातून मृत्यूचे कारण स्पष्ट केले जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली. (हेही वाचा- 17 वर्षापूर्वी दोन मित्रांनी केलेल्या हत्येचे गूढ उकलले, या वर्षी करण्यात आले सांगाड्यावर अंत्यसंस्कार)

मिळालेल्या माहितीनुसार, हे सांगाडे निवृत्त सरकारी कार्यकारी अभियंता जगन्नाथ रेड्डी (85), त्यांची पत्नी प्रेमा (80), मुलगी त्रिवेणी (62), मुले कृष्णा (60) आणि नरेंद्र (57) यांचे असल्याचा संशय आहे.  पोलिसांनी सांगितले की, हे कुटुंब लोकांमध्ये जास्त मिसळत नव्हते आणि त्यांना गंभीर आजार होता. २०१९ पासून हे कुटुंब बाहेर आलेच नाही. तेव्हापासून त्यांचे घर बंद होते. कुटुंबाने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आला आहे. एका खोलीत ४ सांगाडे आणि दुसऱ्या खोलीत १ सांगाडा सापडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबाला शेवटचे २०२९ जुलै मध्ये पाहिले गेले होते. त्यानंतर त्यांचे घर पूर्णपणे बंद होते. कुटुंबातील कोणतीही गोष्ट बाहेर आली नाही वा कोणतीही व्यक्ती कोणाच्या दृष्टीस पडली नाही. दोन महिन्यापूर्वी सकाळी फिरायला गेलेल्या स्थानिक लोकांना घराचा मुख्य दरवाजा तुटल्याचे दुसून आले. मात्र त्यानंतही पोलिसांना सूचना देण्यात आली नाही. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी तपासणी केल्यावर दिसले की, घरात काही वस्तूची तोडफोड झाली.