Uttar Pradesh Shocker: उत्तर प्रदेशात राहत्या घरात आई आणि मुलाची आत्महत्या, नेमकं काय घडलं?
Suicide Representational Image (Photo Credits: ANI)

Uttar Pradesh Shocker: उत्तर प्रदेशातील जालौन परिसर एका घटनेने हादरले आहे. क्षुल्लक घरगुती कारणाने आई आणि मुलाने आत्महत्या केली. आई आणि मुलामध्ये वाद झाला या वादनंतर दोघांनी राहत्या घरी आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा घरातील एका रुममध्ये मुलगा लटकलेल्या अवस्थेत दिसला तर आईने विष प्राशन केले होते. पोलिस अधिकाऱ्याने दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओराई कोतवाली परिसरात ही घटना घडली. आईने घरात आवडती भाजी नाही बनवली त्यामुळे घरात चांगलाच वाद निर्माण झाला. दिग्विजय सिंग  (28) असं आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे. तर बेबी चौहान (55) असं आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. दिग्विजयने आईला आवडती भाजी बनवण्यास सांगितले त्यावर आईने आधीच भाजी बनवून झाल्याचे उत्तर दिले. आणि घरी दोनच लोक खातात असे सांगून भाजी बनवण्यास नकार दिला. यावर दोघांचे भांडण झाले.

भांडणात मुलाने घरातील वस्तूंची तोडफोड करण्यास सुरुवात केली.  घराच्या भरात आईने विष प्राशन केले हे पाहून मुलगा घाबरून दुसऱ्या रुममध्ये गेला आणि त्याने देखील घरातील फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. शेजाऱ्यांनी या घटनेची दखल घेतली आणि हे प्रकरण पोलिसांना सांगण्यात आले. पोलिसांनी दोघांचे ही मृतदेह ताब्यात घेतले आहे. या प्रकरणामुळे संपुर्ण परिसर हादरले आहे.