भारतीय स्टेट बँक (SBI) ने, विशेष कॅडर अधिकारी (SCO) आणि उपमहाव्यवस्थापक (DJM) या पदांसाठी अर्ज मागवण्याची अधिसूचना जारी केली आहे. या दोन पदांसाठी एकून 77 जागा उपलब्ध आहेत. ट्विटरवर देखील एसबीआयने अशा प्रकारची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जे लोक या पदांसाठी इच्छुक असतील त्यांनी एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आजपासून अर्ज करण्याची मुदत सुरु झाली झाली असून, 12 ऑगस्ट 2019 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असणार आहे.
SBI is hiring for the role of Deputy General Manager (Asset Liability Management). If your work profile matches the job profile, apply now. To know more, visit https://t.co/MxZqeRW2av#SBI #StateBankofIndia #WeAreHiring #Recruitment pic.twitter.com/d4UHufRIQZ
— State Bank of India (@TheOfficialSBI) July 22, 2019
अशी आहेत पदे –
- Deputy General Manager: 1 post
- SME Credit Analyst: 11 posts
- SME Credit Analyst: 4 posts
- SME Credit Analyst: 10 posts
- Credit Analyst: 30 posts
- Credit Analyst: 20 posts
एसबीआय च्या अधिकृत वेबसाईटवर करियरया विभागात या पदांची माहिती मिळेल. Apply Online या बतानाबर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमची सर्व माहिती भरावी लागेल. संपूर्ण फॉर्म भरल्यावर तुम्हाला फॉर्म फी भरावी लागेल. या सर्व गोष्टी सबमिट केल्यानंतर, आपल्याला आपल्या अर्जाच्या सबमिशनबद्दल एसबीआयकडून अधिसूचना मिळेल. (हेही वाचा: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात नोकरीच्या विविध संधी; जाणून घ्या पदे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर माहिती)
जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस श्रेणी उमेदवारांसाठी एसबीआय भर्ती अर्जाचे शुल्क 750 रुपये निश्चित केले आहे. तर एससी/एसटी/पीडब्ल्यूडी श्रेणी उमेदवारांसाठी, अर्ज शुल्क 125 रुपये असणार आहे.