Jharkhand Crime News: रॉकेल टाकून पत्नीसोबत आईला पेटवलं, आरोपी घटनास्थळावरून फरार, वाचा नेमकं प्रकरण काय?
Fire (PC - File Image)

Jharkhand Crime News: झारखंड राज्याच एका व्यक्तीने आपल्या आईला आणि बायकोला जाळून टाकण्याचा प्रयत्न केला.  या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. हा धक्कादायक प्रकार ऐकाताच पोलीसही चक्रावले आहे. विशेष म्हणजे आरोपीने दोन्ही महिलांवर जाळून घटनास्थळावरून फरार झाला. मिळालेल्या माहिती नुसार आदल्या आरोपी पतीचे पत्नी सोबत भांडण झाले. दुसऱ्या दिवशी आरोपीने बायकोच्या अंगावर रॉकेल ओतलं, तर आईने सुनेला वाचवायला जात असताना माथेफीरुने आईच्या ही अंगावर रॉकेल ओतल आणि तीला ही जाळण्याचा प्रयत्न केला.

घरात दोघींही ओरडत असताना, शेजारच्यांनी दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. ही घटना चतरा गावातील सुरहीबागी येथे घडली. पोलीसांना या घटनेची माहिती देण्यात आली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कुलदीप दांगी याने आपल्या बायकोला जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. आई वाचवायला गेली असताना तीच्यावर ही रॉकेल ओतून जाळलं. दोघांचा ही आवाज ऐकताच, शेजारच्यांनी त्यांना बाचवण्यासाठी धाव घेतला. दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. पोलीसांना या घटनेची संपुर्ण माहिती देण्यात आली.

पोलीसांनी आरोपीला पकडण्यास घटनास्थळी धाव घेतला. तर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला अशी माहिती मिळाली. पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार दोघीचां ही या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.पोलीसांनी आरोपीला पकडण्यासाठी पथके नेमली आहे. दोघांचा ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.[Poll ID="null" title="undefined"]