Chief Election Commissioner, Sunil Arora | (Photo Credits: ANI)

निवडणूक आयोगाने (Election Commission of India) झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा (Sunil Arora)  यांनी आज (शुक्रवार 1 नोव्हेंबर 2019) ही घोषणा केली.  या वेळीही झारखंड विधानसभेची निवडणूक (Jharkhand Legislative Assembly Elections 2019) एकूण 5 टप्प्यात पार पडत आहे. पहिला टप्पा 30 नोव्हेंबर, दुसरा 7 डिसेंबर, तिसरा टप्पा 12 डिसेंबर,  चौथा टप्पा 16 डिसेंबर तर पाचवा टप्पा 20 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. तर, 23 डिसेंबर 2019 या दिवशी मतमोजणी पार पडणार आहे.

झारखंडच्या 81 सदस्यीय विधानसभेचा कार्यकाल येत्या 5 जानेवारी 2019 या दिवशी समाप्त होत आहे. त्यामुळे तत्पर्वी विधानसभा निवडणूक (Jharkhand Assembly Elections 2019) प्रक्रिया पार पडून नवे सरकार अस्तित्त्वात येणे घटनात्मकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. त्यानुसार व्यवस्थापन करत निवडणूक आयोगाने झारखंड (Jharkhand) विधानसभा निवडणूक जाहीर केली. (हेही वाचा, नागपूर, धुळे, नंदुरबार, अकोला व वाशीम जिल्हा परिषद निवडणूक प्रारुप मतदार याद्या 2 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार)

एएनआये ट्विट

झारखंड राज्यात सध्या भाजप आणि आजसू (ऑल झारखंड स्टूडेंट्स यूनियन) यांचे संयुक्त सरकार सत्तेत आहे. विधानसभा निवडणूक 2014 मध्ये भाजपला 37 तर आजसूला 5 जागा मिळाल्या होत्या. झारखंड विधानसभेत 45 हा बहुमताचा जादूई आकडा आहे. हा आकडा गाठण्यासाठी भाजपला आजसूची मदत घ्यावी लागली. दरम्यान, आपले बहुमत अधिक बळकट करण्यासाठी भाजपने पुढे झारखंड विकास मोर्चाच्या 6 आमदारांना आपल्या पक्षात सहभागी करुन घेतले.