ग्रेटर नोएडा (greater noida) येथील जेवर परिसरातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. जन्मदात्या आईनेच आपल्या मुलाचा खून केल्याचे उघड झाले आहे. यामुळे ग्रेटर नोयडा परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. माहितीनुसार, आपल्या जाऊबाईला फसवण्यासाठी या महिलेने अशा प्रकारचे पाऊल उचलले.
या महिलेने ११ ऑगस्ट रोजी आपला मुलगा हरवल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी या बालकाचा शोध घ्यायला सुरुवात केली. नातेवाईक आणि गावातील काही लोकांची चौकशी करायला सुरूवात केली. या बालकाचे अपहरण कोण करेल? अशा प्रकारचे अनेक प्रश्न पोलिसांना पडू लागले. एखाद्या व्यक्तीने अपहरण केले असेल तर, त्याचा नक्की कॉल येईल, याची पोलीस वाट बघत होते. मात्र, तक्रार नोंदवून १० दिवस परतले तरीदेखील कोणत्याच व्यक्तीचा पोलिसांना कॉल आला नाही. परंतु ११ दिवशी तक्रार करणाऱ्याच्या घरामागून दुर्गंध येऊ लागला. याचीच चौकशी करायला आलेल्या पोलिसांनी जे पाहिले ते आश्चर्यचकीत करणारे होते. पोलिसांना धान्यातून ८ महिन्याचे अर्भक सापडले. पोलिसांनी नातेवाईकांची अधिक चौकशी केल्यानंतर त्यांना कळाले की, त्याच्या आईनेच स्वताच्या बालकाच्या खून केला आहे.
हे देखील वाचा- मुंबई: मुलांच्या शाळेची फी मागणे एका महिलेच्या जीवावर बेतले
माहितीनुसार, या महिलेने तिच्या जाऊबाईला फसवण्यासाठी हा प्रयत्न केला होता. परंतु या महिलेने स्वताला निर्दोष असल्याचे सांगत, तिचा मुलाचा पाय घसरुन पडल्यामुळे मृत्यू झाला, असे तिने सांगितले. तसेच या घटनेनंतर आरोपी महिला पूर्णपणे घाबरली, म्हणून अर्भक धान्यात लपवले. ८-१० दिवसानंतर त्या धान्यातून दुर्गंध येऊ लागल्याने सत्य माहिती समोर आली. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच या महिलेला शिक्षा देण्यात येणार आहे, असे स्थानिक पोलिसांनी सांगितले.