मुंबई: मुलांच्या शाळेची फी मागणे एका महिलेच्या जीवावर बेतले
Representational Image (Photo Credits: Facebook)

मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठी पैसै मागणाऱ्या महिलेला तिचा जीव गमवावा लागला आहे. ही धक्कादायक घटना मुंबई (mumbai) येथील एका परिसरात घडली. माहितीनुसार, मृत महिलेच्या पतीनेच तिचा खून केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर कादेशीर कारवाई करण्यात आली आहे.

पुजा गौड (३०) असे मृत महिलेचे नाव आहे. पुजा ही उन्नत नगर (unnat nagar) येथील रहिवासी होती. मुलांच्या शाळेतील फी भरण्यासाठी पैसे द्या, अशी पुजाने आरोपीकडे मागणी केली . मात्र, त्यावेळी आरोपीने साफ नकार दिला. परंतु, पुजा हिने पुन्हा पैसे मागितल्यानंतर आरोपी संतापला आणि रागाच्या भरात आणि त्याने पुजाचा खून केला.

(हे देखील वाचा- मुंबई: आपल्या 30 वर्षीय लिव्ह-इन पार्टनरचा खून केल्याप्रकरणी 20 वर्षीय युवकाला अटक; व्यभिचाराच्या संशयामधून हे कृत्य घडल्याचा संशय)

त्यानंतर आरोपीने स्थानिक पोलिसांना फोनवरुन आपल्या पत्नीने आत्महत्या केल्याचे सांगितले. घटनास्थळी पोलीस पोहचले तेव्हा पुजाचा मृतदेह हा पंखेला अडकलेला आढळला. आपल्या पत्नीने गळफास घेतल्याचे सांगून आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पुजाच्या पतीनेच तिचा खून केल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली. चौकशी दरम्यान आपणच पुजाचा खून केला असल्याचे आरोपीने कबूल केले.