मुंबई: आपल्या 30 वर्षीय लिव्ह-इन पार्टनरचा खून केल्याप्रकरणी 20 वर्षीय युवकाला अटक; व्यभिचाराच्या संशयामधून हे कृत्य घडल्याचा संशय
Murder | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

आपल्या लिव्ह-इन रिलेशनशिपमधील जोडीदाराच्या (Live-In Partner) हत्येप्रकरणी एका 20 वर्षीय व्यक्तीला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. रामसेन कुरिओ (Ramsen Curio) असे या व्यक्तीचे नाव नाव आहे. रामसेनने आपल्या जोडीदाराचा मृत्यू अपघामुळे झाला असे सांगितले होते. मात्र प्राथमिक वैद्यकीय तपासणीमध्ये या महिलेचा खून झाला असल्याचे निष्पन्न झाले, त्यानंतर पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतले आहे. Mirror Now यांनी याबाबत वृत्त दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 19 ऑगस्ट रोजी आरोपीने आपल्या 30 वर्षीय लिव्ह-इन पार्टनर, मरिना लालमानस्वामी (Marina Lalmanswami) हिला स्थानिक रुग्णालयात दाखल केले. त्याने डॉक्टरांना सांगितले की, ती पाय घसरून पडली व तिला या अपघातात गंभीर दुखापत झाली. रुग्णालयात जात असताना या महिलेचा जखमी जखमी अवस्थेत मृत्यू झाला होता. या संदर्भात वाकोला पोलीस ठाण्यात (Vakola Police Station) अपघाती मृत्यूचा अहवाल (एडीआर) नोंदविला गेला. तथापि, प्राथमिक वैद्यकीय तपासणीत असे दिसून आले की, या महिलेच्या शरीरावर आणि डोक्यावर वारंवार वार झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला. (हेही वाचा: Live-In Relationship मधील कटकटीमुळे त्रस्त? लग्नाआधी एकत्र राहताना 'या' गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी)

अपघाताने मृत्यू झाला असल्याची माहिती खोटी ठरल्यानंतर, मुंबई पोलिसांनी तिच्या लिव्ह-इन पार्टनरविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करत एफआयआर नोंदविला. चौकशी दरम्यान, त्यांच्या शेजाऱ्यांनी ते दोघे सतत भांडत असत व कधी कधी ही भांडणे हिंसेत रुपांतरीत होत असत असे सांगितले. मूळचे मिझोरम येथील हे जोडपे गेली दोन वर्षे सांताक्रूझच्या कलिना भागातील एका अपार्टमेंटमध्ये एकत्र राहत होते. ही महिला हेअर-ड्रेसर म्हणून काम करत होती, तर आरोपी गेल्या अनेक महिन्यांपासून बेरोजगार होता. व्यभिचाराच्या संशयामधून हा खून झाला असल्याचा पोलिसांचा संशय आहे.