Janmashtami 2021: देशभरात आज साजरी केली जाणार श्रीकृष्ण जन्माष्टमी;  राष्ट्रपती ते पीएम मोदी यांनी जनतेला दिल्या शुभेच्छा
Lord Krishna (Photo Credits: Twitter)

Janmashtami 2021: संपूर्ण देशभरात आज ( 30 ऑगस्ट) श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी मथुरेत मोठ्या दिमाखात जन्माष्टमीची तयारी करण्यात आली आहे. त्याचसोबत येथील मंदिरात पहाटेपासूनच आरतीला सुरुवात झाली आहे, याच शुभदिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.(Happy Janmashtami 2021 Messages: जन्माष्टमी दिवशी खास मराठी Wishes, Whatsapp Status, Greetings शेअर करून साजरा करा श्री कृष्ण जन्मदिवस)

रामनाथ कोविंद यांनी ट्विट करत असे म्हटले आहे की, जन्माष्टमीच्या शुभदिनी सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा. हे पर्व भगवान श्रीकृष्ण यांचे आयुष्य आणि त्यांच्या संदशेच्या प्रति स्वत:ला समर्पित करण्याचा काळ आहे. माझी अशी अपेक्षा आहे की, हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, स्वास्थ आणि समृद्धीने भरभराट होई दे.

Tweet:

Tweet:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटले, तुम्हा सर्वांना जन्माष्टमीच्या खुप शुभेच्छा. जय श्रीकृष्ण! (Lord Krishna Quotes in Marathi: श्रीकृष्णाने भगवतगीतेत केलेले 'हे' उपदेश सांगतात जीवनाचे सार!)

Tweet:

उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले की, श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभ पर्वानिमित्त सर्व भाविकांसह देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. संपूर्ण जगाचे पालनकर्ते, लीलाधारी भगवान श्रीकृष्ण यांना सर्वांचे कल्याण कर अशी त्यांच्याकडे मी इच्छा व्यक्त करतो.

Tweet:

दरम्यान, रविवारी दिल्ली पोलिसांनी जन्माष्टमीचा सण पाहता राजधानीत सुरक्षा व्यवस्था अधिक कठोर केली आहे. या व्यतिरिक्त लोकांना कोविडच्या नियमांचे पालन सुद्धा करण्यास सांगितले आहे. जन्माष्टमीचा सण पाहता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा करण्यात आला आहे.