
Jammu-Kashmir: जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक (Kishtwar Terrorist Attack) सुरू आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, चतरू भागातील सिंगपोरा येथे ही चकमक झाली जिथे सुरक्षा दलांना दहशतवाद्यांचा सामना करावा लागला. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरूच आहे. या चकमकीत एक सैनिकाचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी जम्मू आणि काश्मीरमधील केल्लर, शोपियान आणि त्राल येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत सहा दहशतवादी मारले गेले. जम्मू आणि काश्मीर पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) यांच्या सहकार्याने भारतीय लष्कराने ही कारवाई केली.
दुसरीकडे, राजौरी जिल्ह्यातील मेंढर सेक्टरमध्ये अलिकडेच झालेल्या युद्धबंदी उल्लंघन आणि सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारानंतर, भारतीय सैन्याने सीमावर्ती गावांमधील बाधित नागरिकांना मदत करण्यासाठी घरोघरी जाऊन मदत सुरू केली. भारतीय सैनिक प्रत्येक घरी वैयक्तिकरित्या भेट देऊन साहित्य पोहोचवत आहेत. त्याशिवाय सुरक्षेच आश्वासन आणि सहानुभूती देखील देत आहेत.