Jagdalpur Road Accident: छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यात शनिवारी मिनी मालवाहू वाहन उलटून पाच जण ठार झाले, तर अनेक जण जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले. अतिरिक्त पोलिस अधीक्षक (एएसपी) महेश्वर नाग यांनी दिलेल्या माहितीनुसार, जगदलपूरमधील दरभा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील चांदमेटा गावाजवळ सुमारे 45 लोक घेऊन जाणारा ट्रक हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच सीआरपीएफने घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य केले, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, अपघाताचे वैद्यकीय अधिकारी दिलीप कश्यप यांनी सांगितले की, "आम्हाला दुपारी साडेचारच्या सुमारास अपघाताची माहिती मिळाली.
छत्तीसगडमध्ये अपघात, 5 जणांचा मृत्यू
#WATCH | 5 dead and several others injured as mini goods vehicle overturns in Jagdalpur of Chhattisgarh’s Bastar district
Visuals from the hospital where the injured are being taken for treatment pic.twitter.com/h0ECePdTga
— ANI (@ANI) December 21, 2024
आतापर्यंत सुमारे 30 जखमींना दाखल करण्यात आले आहे. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 1 जणाचा येथे मृत्यू झाला. आमच्याकडे मिळालेली माहिती - 81 लोक जखमी झाले आहेत." अपघाताचा पुढील तपास सुरू आहे, असेही ते म्हणाले.