Representational Image | Pixabay

NBEMS च्या National Board of Examinations कडून Master of Dental Surgery साठी आज अ‍ॅडमीट कार्ड जारी केले जाणार आहे. हे हॉलतिकीट जारी झाल्यानंतर विद्यार्थी ते डाऊनलोड करू शकतात. अधिकृत वेबसाईट natboard.edu.in वरून विद्यार्थ्यांना हॉलतिकीट पाहता येणार आहे. दरम्यान परीक्षा 19 एप्रिलला होणार असून त्याचा निकाल 19 मे 2025 दिवशी जारी होण्याचा अंदाज आहे. NEET MDS ही परीक्षा विविध MDS courses साठी घेतली जाते. हॉल तिकिट सोबतच परीक्षा केंद्रावर जाताना वैध वैयक्तिक ओळखपत्र देखील सोबत बाळगणे आवश्यक आहे. प्रवेशपत्र आणि वैध ओळखपत्राशिवाय परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

NEET MDS 2025 admit card डाऊनलोड कसं कराल?

  • अधिकृत वेबसाईट natboard.edu.in ला भेट द्या.
  • NEET MDS 2025 admit card link वर क्लिक करा.
  • तुमचे लॉगिन डिटेल्स टाका.
  • आता हॉलतिकीट तुमच्या समोर दिसेल.
  • हॉलतिकीट तपासून नीट डाऊनलोड करा.
  • त्याची प्रिंट आऊट देखील काढून ठेवू शकता.

हॉलतिकीट डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांनी त्यांचा नोंदणीकृत आयडी आणि पासवर्ड वापरून अधिकृत पोर्टलवर लॉग इन करावे. NEET MDS 2025 ही computer-based परीक्षा आहे, जी 19 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत एकाच सत्रात घेतली जाणार आहे. APAAR ID: भारताचा ‘एक राष्ट्र, एक विद्यार्थी आयडी’ उपक्रम; गोपनीयता आणि सुरक्षिततेबात घ्या जाणून .

NBEMS नुसार, NEET MDS 2025 ची परीक्षा काटेकोरपणे वेळेच्या स्वरूपात घेतली जाईल. सध्याच्या विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण होईपर्यंत उमेदवारांना पुढील विभागात जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. एकदा एखाद्या भागासाठी दिलेला वेळ संपला की, पुढील भागातील प्रश्न आपोआप येतील आणि उमेदवार मागील भागातील उत्तरे पुन्हा पाहू शकणार नाहीत किंवा त्यात बदल करू शकणार नाहीत.