
Vidarbha Temperature: राज्यात कुठे उष्णता तर कुठे पावसाचा खेळ सुरू आहे. विदर्भाच्या बहुतांश भागात शुक्रवारी तीव्र उष्णतेच्या (Vidarbha Temperature) झळांनी नागरिक हैराण झाले होते. बहुतेक शहरांमध्ये कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवले गेले. प्रादेशिक हवामान विभागाच्या (Meteorological Department) निरीक्षणानुसार, अकोल्यात (42.8) अंश सेल्सिअस तापमान नोंदवले(Akola Records Highest Temperature) गेले. जेकी सर्वात उष्ण होते. त्यानंतर चंद्रपूर (42.4) (Chandrapur) , यवतमाळ (42) अंश सेल्सिअस तापमान होते.
संपूर्ण विदर्भात दिवसा कोरडे तापमान होते. मात्र, काही भागात हवामान विभागाने जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. नागपूरमध्ये 11 एप्रिलसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र तेथे पावसाने हजेरी लावली नाही. जोरदार वारे वाहत होते. दिवसभर तापमान उष्ण राहिले, पारा 40.2 अंश सेल्सिअसच्या उच्चांकाला स्पर्श करत होता. किमान तापमान 24.4 अंश सेल्सिअस होते. Mumbai Monsoon Arrival Update: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता
12 एप्रिल रोजी गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या चार जिल्ह्यांत हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट जारी केला होता. मात्र, त्याही दिवशीही पावसाच्या हलक्या सरीही बसरल्या नाहीत. त्यामुळे हवामान विभागाने 13 एप्रिल रोजी कोणताही अलर्ट जारी केला नव्हता.14 एप्रिल रोजी म्हणजेच उद्या विदर्भाच्या काही भागात वादळी वारा आणि पवसाची शक्यता दर्शविली आहे.
नागपूर जिल्हा पुढील चार दिवस ग्रीन झोनमध्ये राहील. मात्र,हवामान विभागाने कोणताही इशारा जारी केलेला नाही. शुक्रवारी झालेल्या अल्पकालीन वाऱ्याच्या हालचालींमुळे अल्पकालीन यलो अलर्ट संपला आहे. येत्या काही दिवसांत शहरात उष्ण आणि कोरडी परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.