
Jogeshwari Rail Station Features: मुंबईला (Mumbai Railway Station) लवकरच नव्याने उभारण्यात आलेले आणि आधुनिक सोयींनी युक्त असे जोगेश्वरी रेल्वे टर्मिनस (Jogeshwari Terminus) मिळणार आहे. हा शहरातील मागील 30 वर्षांतील पहिला ग्रीनफिल्ड प्रकल्प असणार आहे. या टर्मिनसच्या सुरूवातीने बांद्रा, दादर आणि मुंबई सेंट्रल यासारख्या गजबजलेल्या स्थानकांवरील ताण कमी होईल, अशी अपेक्षा आहे. 1991 मध्ये बांधण्यात आलेले कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) हे आजवरचे शेवटचे स्वतंत्रपणे विकसित केलेले स्थानक होते. त्यानंतर काही स्थानकांना मेल/एक्सप्रेस टर्मिनल म्हणून उन्नती दिली गेली, पण नव्याने एकही पूर्ण स्टेशन उभारले गेले नव्हते.
राम मंदिर उपनगरी स्थानकाजवळ हे नवीन स्थानक उभारले जात असून, यासाठी अंदाजे Rs 76.84 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये प्रवाशांसाठी वाहनतळ, टॅक्सी स्टँड आणि खासगी वाहनांसाठी जागा दिली जाणार आहे.
जोगेश्वरी टर्मिनसची प्रमुख वैशिष्ट्ये:
- 3 प्लॅटफॉर्म, प्रत्येकी 600 मीटर लांब, 24 डब्यांच्या गाड्या थांबवण्यास सक्षम
- फेज 1 मध्ये प्लॅटफॉर्म 2 आणि 3 सुरू, प्लॅटफॉर्म 1 नंतर सुरू होणार
- दररोज 12 जोड्या मेल/एक्सप्रेस गाड्या हाताळण्याची क्षमता
- 2 बर्थिंग लाईन्स व 1 शंटिंग लाईन
- जलद सेवा शक्य होईल यासाठी वॉटरिंग फॅसिलिटी
प्रगत पायाभूत सुविधा व प्रवाशी केंद्रित सोयी:
- ग्राउंड+2 सेवा इमारत, जिथे रेल्वे ऑपरेशन्सची व्यवस्था होईल
- 6 मीटर रुंद उड्डाणपूल, राम मंदिर स्थानकाशी जोडलेला, ज्यामध्ये लिफ्ट व एस्कलेटर
- 12 मीटर रुंद फूटओव्हर ब्रिज, जो तिन्ही प्लॅटफॉर्मना जोडेल
ग्राउंड+3 प्रवासी इमारत ज्यामध्ये (खालील बाबींचा समावेश):
- VIP आणि सामान्य वातानुकूलित प्रतीक्षा कक्ष, टॉयलेट, मोबाइल चार्जिंग, पँट्री
- AC व नॉन-AC डबल बेड रूम्स (प्रत्येकी 4)
- डॉरमिटरी रूम्स, प्रत्येकी 6 बेड्स, लिंगानुसार विभाजित
- एंटरटेन्मेंट झोन, फूड प्लाझा आणि
- 50 अधिकृत हमालांसाठी स्वतंत्र विश्रांतीगृह
ईको-फ्रेंडली आणि प्रवाशांसाठी सुलभ रचना:
येथे EV चार्जिंग स्टेशन, VIP पार्किंग, तसेच टॅक्सी, ऑटो आणि ओला/उबरसाठी स्वतंत्र पिकअप-ड्रॉप झोन उपलब्ध असतील. हे स्थानक Western Express Highway ला थेट जोडलेले असून, 500 मीटरवर मेट्रो स्थानकही आहे.
दरम्यान, या स्थानकात पारंपरिक रेल्वे प्लॅटफॉर्म कव्हर्सऐवजी Proflex शीट डोम-शेप छप्पर असणार आहे. हे स्वतःला आधार देणारे, आकर्षक आणि कार्यक्षम छप्पर असेल.
जोगेश्वरी टर्मिनसचे उघडणे म्हणजे मुंबईच्या रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. अत्याधुनिक सुविधा, नव्या सोयी आणि चांगली कनेक्टिव्हिटी यामुळे हे स्थानक शहराच्या सार्वजनिक वाहतुकीत महत्त्वाची भूमिका बजावेल.