Voting Card Link to Aadhar Card: मतदान कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यास सुरुवात, जाणून घ्या कशी आहे नोंदणी प्रक्रीया
Voter ID Card | (File Photo)

गेल्या आठवड्यात मतदार ओळखपत्र (Voting Card) आधार कार्डाशी (Aadhar Card) संलग्न (Link) करण्याचे निवडणूक आयोगाकडून (Election Commission Of India)  निर्देश देण्यात आले होते. भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे (Shrikant Deshpande) यांनी संबंधीत माहिती दिलेली आहे.  या विशेष मोहिमेला 1 ऑगस्टपासून सुरुवात होणार असुन नागरिकांनी आपलं मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी संलग्न करण्याचे आवाहन आयोगाकडून करण्यात आले आहे. तरी 1 ऑगस्ट म्हणजे कालपासून या प्रक्रीयेला सुरुवात झाली आहे. तरी आधार कार्ड मतदान कार्डाबरोबर लिंक करणं ही प्रक्रीया ऐच्छीक ठेवण्यात आली आहे. या सलग्न प्रक्रीयेस कुठलेही बंधन नाही. तसेच ही लिंकिंग प्रक्रीया विनामुल्य असुन भारतीय नागरिक (Indian Citizen) संपूर्ण देशभऱ्यात कुठेही ही प्रक्रीया पुर्ण करु शकतो.

 

जाणून घ्या कशी असेल नोंदणी प्रक्रीया

आधार कार्ड आणि मतदान कार्ड सलग्न करण्यासाठी NVSP पोर्टल (National Voter’s Service Portal)  www.nvsp.in वर नोंदणी करणं अनिवार्य आहे. यावर नोंदणी केल्यानंतर तुम्ही नॅशनल वोटर सर्विस या वेबसाईटवर (Website) जा. त्यात तुम्हाला युजर (User) आणि न्यू युजर (New User) असे दोन पर्याय दिसतील त्यापैकी न्यू युसर या पर्यावर क्लीक करा.  त्यानंतर तुमचा आधार कार्डशी सलग्न असलेला मोबाईल नंबर (Mobile Number) टाकत तुमचा कॅप्चा (Captcha) टाका. त्यानंतर तुम्ही टाकलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी (OTP) येईल तो टाकणं तो टाकणं अनिवार्य असेल. म्हणून तुमचा रेजिस्टर (Register) मोबाईल नंबर आधार कार्डशी  सलग्न असणं बंधनकारक आहे. यानंतर तुमच्या पुढे एक नवं पेज (New Page) ओपन होईल ज्यात तुम्ही तुमची सगळी आवश्यक ती माहिती भरुन स्वत:ची प्रोफाईल रेजिस्टर करा. तुमची प्रोफाईल रेजिस्टर झाल्यावर तुम्ही NSVP पोर्टलच्या माध्यमातून तुमचं आधारकार्ड मतदान कार्डाबरोबर सहज लिंक करु शकता.

 

मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करण्याची प्रक्रीया :-

  • NSVP पोर्टलच्या मुख्यपृष्ठावर जा.
  • मतदार यादीवर (Electoral Roll) क्लिक करा.
  • त्यात तुमचा मतदार आयडी किंवा EPIC क्रमांक (EPIC NO.) टाका.
  •  तुमच्या राज्याचा तपशील टाका.
  • आता फीड आधार क्रमांक (Feed Aadhaar No) दिसेल.
  • फीड आधार क्रमांकावर क्लिक करा.
  • एक नवीन विंडो उघडेल. त्यात तुमचा आधार कार्ड तपशील आणि EPIC क्रमांक टाका.
  • यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा  E-mail ID वर OTP येईल.
  • ओटीपी टाका.
  • आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक झाल्याचं नोटीफिकेशन तुम्हाला दिसेल.

निवडणूक आयोगाकडून  मतदान कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी 31 मार्च 2023 पर्यतची मुदत देण्यात आली आहे. म्हणजे आठ महिन्यांच्या या कालावधीत भारतीय नागरिकांना (Indian Citizen) ही प्रक्रीया पूर्ण करायची आहे.