Vande Bharat Sleeper Train: लवकरच सुरू होणार 'वंदे साधारण ट्रेन', मार्चपर्यंत येणार स्लीपर व्हर्जन, काय आहे खास? जाणून घ्या
Vande Bharat Trains (फोटो सौजन्य - PTI)

Vande Bharat Sleeper Train: वंदे भारत ट्रेन (Vande Bharat Train) तिच्या खास वैशिष्ट्यांमुळे देशात खूप लोकप्रिय आहे. अशा परिस्थितीत आता वंदे भारतच्या काही वेगळ्या आवृत्त्या लाँच करण्याची तयारी सुरू आहे. याअंतर्गत वंदे साधरण ट्रेन (Vande Sadharan Train) आणि वंदे मेट्रो ट्रेन (Vande Metro Train) या वर्षी सुरू होणार आहेत. दुसरीकडे, वंदे भारतची स्लीपर (Vande Bharat Sleeper Train) आवृत्ती देखील लॉन्च केली जात आहे, जी या आर्थिक वर्षात किंवा पुढील वर्षात मार्च महिन्यात लॉन्च केली जाऊ शकते.

तथापी, वंदे भारतच्या स्लीपर आवृत्तीवर वेगाने काम सुरू आहे. मार्च महिन्यापर्यंत ते सुरू होण्याची शक्यता आहे. या ट्रेनमध्ये एकूण 16 डबे असतील, त्यापैकी 11 एसी 3 टायर, 4 एसी 2 टायर आणि 1 डबा फर्स्ट एसी असेल. या ट्रेनचा सेट पुढील वर्षी मार्चपूर्वी तयार होईल, त्यानंतर पहिली ट्रेन चाचणीसाठी पाठवली जाईल. चाचणीमध्ये काही त्रुटी आढळून आल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील आणि नंतर ते लोकांसाठी लाँच केले जाईल. (हेही वाचा - Train Ticket Discount: आजारी रुग्णांसह नातेवाईकांना मिळणार तिकीटाच्या दरात विशेष सवलत, जाणून घ्या कसे)

रेल्वेकडून वंदे मेट्रो ट्रेनचे काम वेगाने सुरू आहे. या कॅलेंडर वर्षाच्या अखेरीस वंदे मेट्रो ट्रेनचा संच तयार होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, जानेवारी-फेब्रुवारीमध्ये ते सुरू करण्याचा विचार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वंदे भारतची साधी आवृत्तीही तयार केली जात आहे. याला नॉन एसी पुश पुल ट्रेन असेही म्हटले जात आहे. ही नॉन एसी वंदे भारत ट्रेन असेल.

या ट्रेनचा सेट तयार आहे, जो यावर्षी ऑक्टोबरमध्ये लॉन्च होण्याच्या तयारीत आहे. ट्रेन सेटमध्ये 22 डबे आहेत आणि दोन्ही बाजूला लोकोमोटिव्ह इंजिन आहेत. वंदे भारत ऑर्डिनरी म्हणजेच नॉन-एसी वंदे भारत ट्रेन 15 ते 31 ऑक्टोबर दरम्यान सुरू होऊ शकते.