Results | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

यूपीएससी मुख्य परीक्षा 2023 चा निकाल (UPSC Mains Result 2023) आज जाहीर करण्यात आला आहे. यंदा यूपीएससीची (UPSC) मुख्य परीक्षा दिलेले विद्यार्थी त्यांचा निकाल अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर पाहू शकतात. यंदा ही परीक्षा देशभर विविध केंद्रांवर 15 सप्टेंबर 2023 ते 24 सप्टेंबर 2023 दरम्यान घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल आता जाहीर झाला आहे. वेबसाईट वर पात्र विद्यार्थ्यांच्या नावाची यादी पीडीएफ स्वरूपात जाहीर करण्यात आली आहे.

मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुढील आणि अंतिम मुलाखतीच्या फेरीला सामोरे जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या रॅन्किंग वरून IAS, IFS, IPS निवडले जाणार आहेत. नक्की वाचा: UPSC Exam Calendar 2024: यूपीएससी कडून CSE Prelims, NDA, CDS Exams ते ESE Prelims 2024 कधी? upsc.gov.in वर पहा वेळापत्रक .

कसा पहाल यूपीएससी मुख्य परीक्षा 2023 चा निकाल?

  • अधिकृत वेबसाईट upsc.gov.in ला भेट द्या.
  • होमपेज वर निकालाची लिंक दिसेल त्यावर क्लिक करा. किंवा वेबसाईट वर परीक्षा आणि त्याखाली निकालाच्या टॅब वर अंतिम निकाल पाहता येईल.
  • निकालावर क्लिक केल्यावर निकाल हा एका पीडीएफ फाईल मध्ये दिसेल जो डाऊनलोड देखील करता येऊ शकतो.
  • आता तुमचा रोल नंबर त्यामध्ये शोधा आणि तुम्ही पुढील फेरीसाठी पात्र झालात का? हे तपासा.

इथे थेट पहा तुमचा निकाल

यूपीएससीची प्रिलिम्सची परीक्षा 28 मे 2023 दिवशी झाली होती त्याचा निकाल 12 जूनला लागला होता. या परीक्षेचा टप्पा पार केलेल्या विद्यार्थ्यांनाच मुख्य परीक्षा देता येते. यूपीएससीच्या परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी दरवर्षी आपलं नशीब आजमावत असतात.