Ujjwala Yojana 2.0: उज्ज्वला योजने अंतर्गत मोफत गॅस कनेक्शनसाठी ऑनलाईन अर्ज कसा कराल?
LPG (Photo Credits: All India Radio News, Facebook)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज उज्ज्वला योजना 2 (Ujjwala Yojana 2.0) चं उद्घाटन करणार आहेत. दारिद्य्ररेषेखालील कुटुंब आणि गरीबांसाठी या योजनेद्वारा भारत सरकार मोफत गॅस कनेक्शन देते. दारिदय्ररेषेखाली असणाऱ्या कुटुंबातील 5 कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्याचे लक्ष्य केंद्र सरकारचे होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात एप्रिल 2018 मध्ये या योजनेचा विस्तार करण्यात आला आणि यामध्ये सात श्रेणीतील महिलांचा समावेश झाला आहे.आता केंद्र सरकार 5 ऐवजी 8 कोटीपर्यंत महिलांना मोफत गॅस कनेक्शन देणार आहे.

किमान 18 वर्ष वय असणार्‍या महिलाच केंद्र सरकारच्या या उज्ज्वला योजनेसाठी पात्र आहेत. त्यांना उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन हवं असल्यास सरकार कडे ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. मग पहा कसा कराल ऑनलाईन अर्ज? नक्की वाचा: LPG Cylinder Booking: आता एका मिल्ड कॉलच्या माध्यमातून होईल तुमचा एलपीजी गॅस सिलिंडर बुक.

उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन साठी कसा कराल ऑनलाईन अर्ज?

अधिकृत वेबसाईट pmujjwalayojana.com वर क्लिक करा.

होमपेजवर डाऊनलोड फॉर्मवर क्लिक करा.

डाऊनलोड फॉर्मवर क्लिक केल्यानंतर पीएम उज्ज्वला योजनेचा फॉर्म येईल.

आता फॉर्ममध्ये विचारलेली सारी माहिती आणि कॅप्चा भरा.

तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर एक OTP जनरेट करण्यासाठी बटणावर क्लिक करा.

त्यानंतर फॉर्म डाऊनलोड करा.

फॉर्म जवळच्या एलपीजी गॅस एजन्सीला सबमिट करा.

केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेसाठी ई केवायासी केले जाणार आहे. त्याकरिता आधारकार्ड हे मुख्य ओळखपत्र म्हणून तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेताना लाभार्थी महिलेच्या कुटुंबातील सदस्यांचे देखील ओळखपत्र सादर करावे लागते तसेच लाभार्थीच्या बँक खात्याचा क्रमांक, IFSC कोड देणे बंधनकारक आहे. या योजनेकरिता एकाच घरात उज्ज्वला योजनेची एकापेक्षा अधिक कनेक्शन्स नसावीत ही देखील अट आहे.