प्रातिनिधिक प्रतिमा (फाइल फोटो )

LPG Cylinder Booking:  जर तुम्ही इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण तेल आणि पेट्रोलियम कंपनीचा एलपीजी डिस्ट्रिब्युशन वर्टिकल, इंडेन आता ग्राहकांना मिस्ड कॉल सुविधेच्या माध्यमातून सिंलिंडर बुक करण्याचा ऑप्शन देत आहे. इंडियन ऑइलने याबद्दल ट्विट केले आहे. त्यांनी ट्विट मध्ये असे म्हटले आहे की, तुमचा नवा #Indance LPG कनेक्शन फक्त आता एका मिल्ड कॉलच्या अंतरावर आहे. 8454955555 क्रमांक डायन लकरुन आपल्या घराच्या दरवाज्यावर एलपीडी कनेक्शन मिळवू शकता. सध्या इंडेन ग्राहकांनी तुमचा रजिस्टर्ड फोन क्रमांकांवर मिस्ड कॉल देऊन रिफिल बुक करु शकता.(How to Apply For Ration card Transfer: दुसर्‍या राज्यात गेल्यास रेशन कार्ड ट्रान्सफर कसं कराल? आवश्यक कागदपत्रं कोणती?)

इंडेनच्या अधिकृत क्रमांकावर मिस्ड कॉल देण्यासाठी ग्राहकांना आपल्या रजिस्ट्रर क्रमांकाचा वापर करावा लागणार आहे. ग्राहकांना त्याच मिस्ड कॉलच्या क्रमांकावर नवे एलपीजी कनेक्शन घेण्याची परवानगी देत आहे. मिस्ड कॉल दिल्यानंतर कंपनी स्वत: त्या व्यक्तिला संपर्क करणार आहे. त्याचसोबत आधार कार्ड आणि पत्त्याच्या माध्यमातून गॅस कनेक्शन नागरिकाला उपलब्ध करुन दिले जाणार आहे.(खुशखबर! सरकार देणार फ्री गॅस कनेक्शन, आता कोणत्याही पत्त्यावरुन बुकिंग करता येईल) 

Tweet:

जर तुम्ही आधीच गॅसचे कनेक्शन घेतले असेल तर तुम्हाला त्याच पत्त्यावर दुसरे कनेक्शन ही मिळू शकणार आहे. मात्र हे कनेक्शन घेतेवेळी तुम्हाला आधार कार्ड आणि कनेक्शनेचे कागदपत्र यांची एक कॉपी गॅस कंपनीला द्यावी लागणार आहे. त्यानंतर तुमच्या पत्त्याची पडताळणी होत तुम्हाला गॅसचे आणखी एक कनेक्शन दिले जाणार आहे.