खुशखबर! सरकार देणार फ्री गॅस कनेक्शन, आता कोणत्याही पत्त्यावरुन बुकिंग करता येईल
LPG Cylinder | (Photo Credits: PTI)

जर तुम्ही मोफत घरगुती गॅस सिलिंडेरचे कनेक्शन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. कारण केंद्रातील मोदी सरकार लवकरच उज्ज्वल योजनाचा दुसरा टप्पा लागू करणार आहेत. सरकारी तेल कंपन्या आता उज्जवलाच्या दुसऱ्या टप्प्याचे अंतिम प्रारुप तयार करत आहे. त्यामुळे तुम्हाला या सुविधेचा फायदा घ्यायचा असेल तर त्यासाठी घरीच बसून त्यासाठी अर्ज करता येणार आहे. या योजनेच्या अंतर्गत आता अशा ही लोक अर्ज करु शकतात ज्यांचे एलपीजी कनेक्शनसाठी कायमचा पत्ता नाही आहे.

या योजनेचा लाभ शहरातील गरिब लोकांना मिळणार आहे. त्याचसोबत या योजनेचा लाभ देशातील विविध भागात नोकरीच्या कारणामुळे पत्ता बदलावा लागतो. तर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या योजनेअंतर्गत आधीच 1 कोटी गॅस कनेक्शन देण्याचे जाहीर केले होते.(7th Pay Commission: कर्मचाऱ्यांच्या 'या' मागणीची मोदी सरकार करणार पूर्तता? वाचा सविस्तर)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 मे 2016 रोजी प्रधानमंत्री उज्जवला योजनाची सुरुवात केली होती. सरकारने धुरापासून होणारे नुकसान लक्षात घेता महिलांसाठी फ्री गॅस सिलिंडर कनेक्शन देण्याची योजना तयार केली होती. या योजनेअंतर्गत मोफत घरगुती गॅस सिलिंडर कनेक्शनसाठी घरबसल्या अर्ज करु शकता येणार आहे. अर्ज करणाऱ्या महिलेचे वय 18 वर्षापेक्षा अधिक असावे. त्याचसोबत त्याचे बँक खाते आणि बीपीएल कार्ड असावे.

>>'या' पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज

-सर्वात प्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

-pmujjwalayojana.com येथे क्लिक करा.

-होमपेजवर डाउनलोड फॉर्मवर जाऊन क्लिक करा.

-डाउनलोड फॉर्मवर क्लिक केल्यानंतर पीएम उज्जवला योजनेचा फॉर्म येईल.

-आता फॉर्ममध्ये तुमचे नाव, ई-मेल आयडी, फोन क्रमांक आणि कॅप्चा लिहा.

-आता ओटीपी जनरेट करण्यासाठी बटणावर क्लिक करा.

-त्यानंतर फॉर्म डाउनलोड करा.

आता हा फॉर्म तुमच्या घरानजीकच्या एलपीजी एजेंसी मध्ये जमा करावा. त्याचसोबत डॉक्युमेंट आधार कार्ड, स्थानिक पत्त्याचे प्रमाण पत्र, BPL रेशन कार्ड आणि तुमचा फोटो असावा. कागदपत्राची पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला एलपीजी गॅस कनेक्शन मिळणार आहे.