रेल्वे प्रवासात 'अॅप'च्या माध्यमातूनही करता येणार 'FIR'
झीरो एफआयआर (संग्रहित प्रतिमा)

रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी. रेल्वे प्रवासादरम्यान लवकरच आपल्याला अॅपच्या माध्यमातून तक्रार दाखल करता येणार आहे. या तक्रारीला झिरो एफआयआरचा दर्जा असेल. तसेच, आरपीएफ या एफआयआरची दखल घेऊन तातडीने चौकशी करेन. छळ, चोरी, महिलांसोबत केले जाणारे गैरकृत्य अशा प्रकारांची तक्रार या अॅपच्यामाध्यमातून करता येणार आहे. आरपीएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली. ही सेवा सध्या मध्यप्रदेशमध्ये सुरु करण्यात आली आहे. लवकरच ती देशभरातील इतर राज्यांमध्येही लागू केली जाणार आहे.

अॅपमध्ये महिलांसाठी  पॅनीक बटन

या अॅपमध्ये महिलांसाठी एक पॅनीक बटनही असणार आहे. अॅपच्या माध्यमातून तक्रार करण्यासाठी प्रवाशाला ऑनलाईनच असायला पाहिजे असे नाही. प्रवासी ऑफलाईन असतानाही तक्रार करु शकतो. आरपीएफचे माहनिदेशक अरुण कुमार यांनी सांगितले की, प्रवाशांना तक्रार करायची असल्यास पुढचे स्टेशन येईपर्यंत वाट पाहण्याची मुळीच गरज नाही. प्रवासादरम्यान अॅपच्या मदतीने तो तक्रार करु शकतो. तक्रार मिळताच आरपीएफ त्या प्रवाशाला मदत करण्यासाठी तातडीने पोहोचेन, अशी माहितीही कुमार यांनी प्रसारमाध्यमांना दिली. (हेही वाचा, कार खरेदी करताय? मग डील करताना या गोष्टींची माहिती हवीच..

झीरो FIRम्हणजे काय?

झीरो एफआयआरचा अर्थ असा की, कोणत्याही पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करता येऊ शकते. तसेच, त्यानंतर तुम्हाला जवळ उपलब्ध असलेल्या पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार दाखल करता येऊ शकते. प्रवासात असताना प्रवाशासोबत एखादी अप्रिय घटना घडली तर, पीडित प्रवासी झीरो एफआयआरच्या माध्यमातून तक्रार दाखल करु शकतो. सध्यास्थितीत एखाद्या प्रवाशाला जर तक्रार करायची असेल. तर, त्याला तिकीट निरीक्षकाकडून मान्यतेचा एक फॉर्म घ्यावा लागतो. तो फॉर्म घेऊन तो पुढच्या स्टेशनवर आरपीएफ किंवा जीआरपीकडे द्यावा लागतो. पुढे हाच फॉर्म एफआयआर म्हणून समाविष्ट केला जातो. यात बराच वेळ खर्च होतो. प्रवाशांच्या तक्रारीचे वेळीच निवारण होत नाही. मात्र, या अॅपमुळे प्रवाशांना आपली तक्रार तक्राळ करता येणार आहे.