लेखी परिक्षा न देता 'या' मार्गाने मिळवा SBI मध्ये नोकरीची संधी!
SBI बँक (File Photo)

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) नोकरीची संधी उपलब्ध करुन देत आहे. ते सुद्धा लेखी परिक्षा न देता तरुणांना नोकरीची संधी या बँकमध्ये मिळणार आहे. एसबीआय कडून जाहीर केलेल्या निवेदनानुसार, बँक कॉन्ट्रॅक्टच्या आधारावर नोकरी देण्यात येणार आहे. तसेच ज्या तरुणाची निवड बँकेकडून केली जाईल त्यांना 12 ते 15 लाख असा भरघोस पगार मिळणार आहे.

निवेदनानुसार, बँकेने स्पेशल कॅडर ऑफिसर पदासाठी भर्ती सुरु केली आहे. परंतु या भर्तीच्या पदासाठी 22 जानेवारीपासून ऑनलाईन प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तसेच अंतिम तारिख 11 फेब्रुवारी असणार आहे. बँकेकडून सिनियर एक्झिक्युटिव्हच्या पदासाठी 15 जागांवर भर्ती करणार आहे.

पदांसाठी या पद्धतीने निवड केली जाणार आहे.

>जनरल कॅटेगरी- 9 पद

>ओबीसी कॅटेगरी- 3 पद

>एसी कॅटेरी- 3 पद

>एसटी कॅटेगरी- 1 पद

वयाची मर्यादा किती असावी?

बँकेत नोकरीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी 25 वर्ष असावी. तर जास्तीत जास्त 35 वर्षीय तरुणांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.

अर्ज भरण्यासाठी शुल्क:

या पदांसाठी नोकरीचा अर्ज करावयाचा असल्यास उमेदवाराला 600 रुपये फी असणार आहे. तर एससी आणि एसटी वर्गासाठी 100 रुपये अॅप्लिकेशन शुल्क भरावे लागणार आहे. मात्र ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरता येणार आहे.

निवड प्रकिया:

या पदासांठी लेखी परीक्षा बँकेकडून घेतली जाणार नाही. उमेदवरांमधून शॉर्टलिस्ट करुन त्यानंतर इंटरव्यू घेतला जाणार आहे. तर इंटरव्यू घेतल्यानंतर मेरिट लिस्टच्या आधारे योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. तर निवड केलेल्या उमेदवाला दोन वर्षासाठी कॉन्ट्रॅक स्वरुपात नोकरी देण्यात येणार आहे.

शिक्षण किती असले पाहिजे?

एसबीआय बँकेतील या नोकरीच्या संधीसाठी उमेदवाराचे शिक्षण सीए (CA) किंवा फायनान्समध्ये एमबीए झालेले असले पाहिजे. तसेच दोन वर्षांचा अनुभव उमेदवाराल असणे आवश्यक आहे.

कुठे मिळणार नोकरीची संधी?

निवड केलेल्या उमेदवारांना मुंबई मध्ये नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु अद्याप कोणतेही ठिकाण नोकरीसाठी निश्चित करण्यात आलेले नाही.