2000 Rupees Note: तुमच्याकडे अजूनही दोन हजार रुपयांच्या नोटा असतील तर त्या बदलून तुमच्या खात्यात जमा करण्याची आज शेवटची संधी आहे. 7 ऑक्टोबरनंतर दोन हजार रुपयांच्या नोटा बदलल्या जाणार नाहीत आणि बँकांमध्ये जमाही केल्या जाणार नाहीत. तथापि, आरबीआयच्या 19 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तुम्ही दोन हजारांच्या नोटा बदलू शकता. ज्यांना क्षेत्रीय कार्यालयात जाता येणार नाही ते पोस्टाद्वारे नोटा बदलून घेऊ शकतील. आरबीआयने सांगितले की, 96 टक्के म्हणजेच 3.43 लाख कोटी रुपयांच्या 2,000 रुपयांच्या नोटा बँकांकडे परत आल्या आहेत. त्यापैकी 87 टक्के नोटा जमा करण्यात आल्या आहेत. मात्र, 3.37 टक्के म्हणजेच 12,000 कोटी रुपयांच्या नोटा अजूनही बाजारात आहेत.
यापूर्वी, RBI ने बँकांमध्ये 2,000 रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी 30 सप्टेंबर ही अंतिम तारीख निश्चित केली होती. पण आरबीआयने नोटा बदलून खात्यात जमा करण्याची तारीख 7 ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती. यावर्षी 19 मे रोजी आरबीआयने 2,000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. यानंतर लोकांनी दोन हजार रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा केल्या आणि त्या परतही केल्या. मात्र, सुरुवातीचे दिवस वगळता या काळात बँकांमध्ये फारशी गर्दी नव्हती. (हेही वाचा - New Rules from 1st October 2023: डेबिट-क्रेडिट कार्ड नेटवर्कसह ऑनलाइन गेमिंग संदर्भात बदलले 'हे' नियम; तुमच्या खिशावर 'असा' होणार परिणाम)
दरम्यान, आरबीआयने जारी केलेल्या निवेदनात असेही म्हटले आहे की, 7 ऑक्टोबरनंतरही 2000 रुपयांच्या नोटा वैध राहतील. न्यायालये, कायद्याची अंमलबजावणी संस्था, सरकारी विभाग किंवा सार्वजनिक अधिकारी 2000 रुपयांच्या नोटा RBI च्या 19 कार्यालयांमध्ये कोणत्याही मर्यादेशिवाय जमा करू शकतील.
बँकांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, 19 मे 2023 पर्यंत चलनात असलेल्या 3.56 लाख कोटी रुपयांच्या 2000 रुपयांच्या नोटांपैकी 3.42 लाख कोटी रुपयांच्या नोटा बँकांकडे परत आल्या आहेत. 29 सप्टेंबर रोजी व्यवसाय बंद झाल्यानंतर केवळ 0.14 लाख कोटी रुपयेच चलनात राहिले. अशाप्रकारे, 19 मे 2023 रोजी चलनात आलेल्या 2000 रुपयांच्या नोटांपैकी 96% नोट आता बँकांमध्ये परत आल्या आहेत.