
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरूणींसाठी ठाणे महानगरपालिकेने सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. ठाणे महापालिकेने नर्स पदासाठी मोठ्या संख्येने भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या 1 हजार 30 रिक्त जागेवर नर्स पदासाठी (GNM and ANM)भरती सुरु करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, नर्सिंगचे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसह फ्रेशर्स देखील या पदासाठी अर्ज करु शकतात. या रिक्त पदांसाठी उमेदवाराची थेट निवड केली जाणार आहे. तसेच निवड झालेल्या उमेदवाराला प्रतिमहिना 35 ते 40 हजार इतका पगार देण्यात येणार आहे. या भरतीबाबत अधिक माहितीसाठी उमेदवार ठाणे महानगरपालिकेच्याअधिकृत संकेत स्थळावर भेट देऊ शकतात.
नर्स (GNM and ANM) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. यासाठी उमेदवाराने GNM/B.Sc नर्सिंग डिग्री, ANM मध्ये डिग्री प्राप्त केली असावी. तसेच त्यांना 2 ते 3 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. वयोमर्यादा ही नियमानुसार ठरवण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे, उमेदवाराला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. यासाठी उमेदवाराला https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html या किंवा https://est.tmconline.in/ या लिंकवर भेट द्यावी लागणार आहे. इच्छुक उमेदवाराला 28 जुलैपर्यंत ऍप्लिकेशन फॉर्म भरून सबमिट करावा लागणार आहे. हे देखील वाचा- 12 हजार 538 पदांची भरती प्रक्रिया डिसेंबर पर्यंत पूर्ण करणार; गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
उमेदवाराची निवड शॉर्ट लिस्टिंग लिखित परीक्षा / कौशल्य चाचणी अर्थात स्किल टेस्ट आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. त्याशिवाय, उमेदवाराला शारीरिक तंदुरुस्ती-फिजिकल फिटनेस आणि वैद्यकीय-मेडिकल फिटनेस असणे देखील महत्त्वाचे आहे. फ्रेशर्स देखील या पदासाठी अर्ज करु शकतात. या रिक्त जागांसाठी काम करण्याचे ठिकाण ठाणे असणार आहे.
कोरोना संकटाच्या काळात डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आपली जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करत आहेत. यामुळे संपूर्ण देशातून डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर कौतूकाचा वर्षाव केला जात आहे. ठाणे महापालिकेने हीच संधी आता अनेकांसाठी उपलब्ध करून दिली आहे.